एक्स्प्लोर
आतापर्यंत केवळ 7 गोलंदाजांनीच कसोटीत 500 हून अधिक विकेट्स घेतल्या, पाहा संपूर्ण लिस्ट

muthaya murali dharan
1/7

मुथय्या मुरलीधरन हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने 800 विकेट्स घेतल्या आहेत. मुरलीधरनची गोलंदाजीची सरासरी 22.72 आहे, म्हणजे जवळपास प्रत्येक 22 धावा खर्च केल्यानंतर या श्रीलंकेच्या फिरकीपटूला एक विकेट मिळाली आहे.
2/7

ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज शेन वॉर्न हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. वॉर्नने 708 विकेट घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरी 25.41 आहे.
3/7

या यादीत इंग्लिश वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. अँडरसनने आतापर्यंत 646 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरी 26.52 आहे.
4/7

या यादीत चौथ्या क्रमांकावर भारतीय फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेचे नाव येते. कुंबळेने आपल्या कसोटी कारकिर्दीत 29.65 च्या गोलंदाजीच्या सरासरीने 619 विकेट्स घेतल्या आहेत.
5/7

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मगरा या यादीत टॉप-5 मध्ये येतो. मगराच्या नावावर 563 विकेट आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरी 21.64 आहे.
6/7

इंग्लिश वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड हा सर्वाधिक कसोटी बळी घेणारा सहावा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत 541 विकेट्स आहेत.
7/7

वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्स हा 500 कसोटी बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज होता. त्याच्या नावावर 24.44 च्या गोलंदाजीच्या सरासरीने 519 विकेट्स आहेत.
Published at : 09 Jun 2022 08:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion