एक्स्प्लोर
Donald Trump Win : ट्रम्प यांच्या विजयानंतर मोदी भावुक, फोटो शेअर करत दिला मित्राला खास संदेश
Donald Trump's Victory : पीएम मोदी यांनी ट्रम्प यांचे निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे असे ते म्हणाले.

पीएम मोदी यांनी ट्रम्प यांचे निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे असे ते म्हणाले.
1/7

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
2/7

पीएम मोदींनी लिहिले, ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचे हार्दिक अभिनंदन. भारत-अमेरिका यांच्यामध्ये व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
3/7

पीएम मोदींनी ट्रम्प यांच्या यशाचे ऐतिहासिक विजय असं वर्णन केलं आणि दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी मजबूत करण्याचा उल्लेख केला.
4/7

ट्रम्प यांचे हे यश दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी एक पाया आहे, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
5/7

निवडणुकीत विजय निश्चित झाल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेतील जनतेचे आभार मानले आहेत. देशाच्या सर्व समस्या सोडवू असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवणार असल्याचेही ते म्हणाले.
6/7

अलास्का, नेवाडा आणि ऍरिझोनामध्ये जिंकणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ट्रम्प म्हणाले की, मी अमेरिकन लोकांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी लढणार आहे. येणारी 4 वर्षे अमेरिकेसाठी महत्त्वाची आहेत.
7/7

अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात नेत्रदीपक विजय आहे. इलॉन मस्कचे कौतुक करताना ट्रम्प म्हणाले - इलॉन एक स्टार आहे. निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी रॉकेटप्रमाणे काम केलं.
Published at : 06 Nov 2024 04:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion