मोठी बातमी: बीडच्या धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, विक्रम मुंडे, अतुल मुंडेंवर गुन्हा दाखल
Dhananjay Nagargoje Case : बीडच्या आश्रमशाळेतील शिक्षक (Teacher) धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आत्महत्या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dhananjay Nagargoje Case बीड : बीडच्या आश्रमशाळेतील शिक्षक (Teacher) धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या केलेल्या शिक्षक नागरगोजे (Dhananjay Nagargoje) यांच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष विक्रम मुंडे, सचिव अतुल मुंडे व इतरांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी अठरा वर्ष पगार मिळाला नाही म्हणून संस्था चालकासह इतर काही जणांचे नाव सुसाईड नोटमध्ये लिहून आत्महत्या केली होती.
दरम्यान, या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas danve) यांनी बीडमधील आत्महत्याप्रकरणावरुन सरकारला सवाल केला आहे. तसेच, याप्रकरणी अद्यापही संस्थाचालकांवर गुन्हा का दाखल नाही, असा जाब दानवे यांनी विचारला. परिणामी विधान परिषदेत देखील याचे पडसाद उमटताच बीड मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आता गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शिक्षक आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
बीड जिल्ह्यातील एका आश्रम शाळेतील शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र तक्रार दाखल न करून घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी अविनाश पाठक समाज कल्याण अधिकाऱ्यांमार्फत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बीड शहरातील कृष्ण अर्बन बँकेच्या आवारात धनंजय नागरगोजे या शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी नागरगोजे यांनी एक सुसाईड नोट सोशल माध्यमावर पोस्ट केली होती. अठरा वर्षांपासून पगार न मिळाल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला होता. घटना घडल्यानंतर कोणीही या प्रकरणात तक्रार न देण्यासाठी पुढे न आल्याने गुन्हा दाखल झाला नाही. मात्र किमान वेतन कायदा डावलल्या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करा. तसेच संबंधित संस्थाचालक यांच्या विरुद्ध देखील आत्महत्येस जबाबदार असल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असता या प्रकरणी आता हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

