एक्स्प्लोर
PHOTO : मुंबईच्या राजाचा थाट लय भारी, त्याच्या दर्शनासाठी दुमदुमली नगरी सारी... गणेशगल्लीचा 22 फुटीवाला विसर्जनासाठी मार्गस्थ
Mumbaicha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE : गणेशोत्सवाची आज सांगता... मुंबईत लालबागचा राजा, गणेशगल्लीचा राजा, चिंतामणीसह सार्वजनिक गणरायांचं विसर्जन, घरगुती गणपतींनाही निरोप दिला जाणार आहे.

Mumbaicha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE
1/9

लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच, गणेशगल्लीचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.
2/9

सर्वात आधी मुंबईच्या राजाची आरती पार पडली, त्यानंतर मुंबईच्या राजाचा जयघोष करण्यात आला.
3/9

अकरा दिवस अथोचित पाहुणचार घेतल्यानंतर मुंबईचा राजाची विसर्जन मिरवणूक थाटामाटात सुरू झाली आहे.
4/9

गुलालाची उधळण, गणपती बाप्पा मोरया, 22 फुटी वाले की जयच्या जयघोषात सर्वांचा लाडका विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.
5/9

मुंबईचा राजा आपल्या दरबारातून निघाला असून संपूर्ण लालबाग नगरीला एक प्रदक्षिणा घालून त्यानंतर विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे.
6/9

मोठ्या संख्येनं भाविक मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले असून ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरला आहे.
7/9

गुलालाची उधळण करत, ढोल-ताशांच्या गजरात गणेशगल्लीकर आपल्या लाडक्या मुंबईच्या राजाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.
8/9

संपूर्ण लालबागमध्ये अनेक पुष्पवृष्टी मुंबईच्या राजावर फुलांचा वर्षाव करण्यासाठी सज्ज आहेत.
9/9

अकरा दिवस आपल्याकडे पाहुणचार घेणाऱ्या लाडक्या मुंबईच्या राजाला कार्यकर्ते साश्रू नयनांनी निरोप देत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Published at : 17 Sep 2024 08:41 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
बातम्या
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
