एक्स्प्लोर
AAP : कधित मद्य धोरण घोटाळ्यात के. कविता ते मनीष सिसोदिया चार जणांना जामीन, अरविंद केजरीवाल अजूनही तुरुंगात, जामीन कधी?
Arvind Kejriwal : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात अटकेत असलेल्या आपच्या विजय नायर यांना सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केला आहे.

आपच्या विजय नायर यांना जामीन मंजूर
1/5

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी आम आदमी पार्टीच्या विजय नायर यांना अखेर जामीन मिळाला आहे. आपचे कम्युनिकेशन इंचार्ज म्हणून काम केलेल्या नायर यांना सुप्रीम कोर्टानं जामीन दिला आहे.
2/5

विजय नायर 23 महिने म्हणजेच जवळपास दोन वर्ष तुरुंगात होते. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत.
3/5

विजय नायर यांना अटक केल्यानंतर मनीष सिसोदिया यांना ईडीनं अटक केली होती. मद्य धोरण घोटाळ्यात सिसोदिया यांना देखील सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केला होता. विजय नायर यांना जामीन देताना मनीष सिसोदिया आणि के कविता यांच्या प्रकरणाचा दाखला देण्यात आला.
4/5

आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना देखील ईडीनं या प्रकरणात अटक केली होती. मात्र, संजय सिंह यांची देखील जामिनावर सुटका झाली.
5/5

भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांना देखील दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांना काही दिवसांपूर्वीच जामीन मिळाला आहे. आता दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. केजरीवालांना ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाला आहे. मात्र, सीबीआयनं त्यांना अटक केलेली आहे.
Published at : 02 Sep 2024 02:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नागपूर
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion