एक्स्प्लोर
Rahul Gandhi: राहुल गांधी दिसले 'कुली'च्या अंदाजात; डोक्यावर उचलल्या प्रवाशांच्या बॅगा, पाहा फोटो
Rahul Gandhi Became Coolie: काँग्रेस खासदार हे नेहमीच त्यांच्या दौऱ्यांवरुन चर्चेत असतात. नुकतीच राहुल गांधींनी रेल्वे स्थानकाबाहेरच्या हमालांना भेट दिली, यावेळी ते अनोख्या अंदाजात दिसले.

Rahul Gandhi Became Coolie
1/10

काँग्रेस नेते राहुल गांधी गुरुवारी (21 सप्टेंबर) दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्टेशनवर पोहोचले. तिथे त्यांनी हमालांची भेट घेतली.
2/10

राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर सर्व हमाल आणि रिक्षाचालक खूप आनंदी दिसत होते. राष्ट्रीय पातळीवरील नेता हमालांसोबत येऊन गप्पा मारतो आणि त्यांच्या जीवनाचा अनुभव घेतो, यात त्यांना खूप नवल वाटलं.
3/10

हमालांनी आपला आनंद व्यक्त करताना म्हटलं की, "राहुल गांधी आम्हाला भेटायला आले याचा आम्हाला खूप आनंद झाला. राहुल गांधी यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की, ते आम्हा हमालांच्या सर्व समस्या सरकारसमोर ठेवतील आणि त्या सोडवण्याचा प्रयत्नही करतील."
4/10

इतकंच नाही तर, या दरम्यान राहुल गांधींनी कुलींचा, म्हणजेच हमालांचा लाल गणवेश परिधान केला.
5/10

एका हमालाकडून त्यांनी हाताच्या दंडावर 756 नंबरचा बिल्ली देखील लाऊन घेतला.
6/10

कुली नंबर 756 च्या अंदाजातील राहुल गांधींनी सर्व हमालांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या.
7/10

कुली राहत असलेल्या जागेची आणि त्यांना देण्यात आलेल्या लॉकर रुमची देखील राहुल गांधींनी पाहणी केली, प्रत्यक्ष ग्राऊंड लेव्हलला जाऊन हमाल कशा प्रकारे जीवन जगतात? कसे राहतात? त्यांच्या समस्या काय? हे सर्व राहुल गांधींनी समजून घेतलं.
8/10

इतकंच काय, तर राहुल गांधींनी दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांचं सामान देखील डोक्यावर उचललं.
9/10

नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये रेल्वे स्टेशनच्या हमाल बांधवांनी राहुल गांधींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यानंतर राहुल गांधी त्यांना भेटण्यासाठी रेल्वे स्टेशनवर पोहोचले.
10/10

राहुल गांधी यांनी मनमोकळेपणाने सर्व हमालांशी संवाद साधला आणि त्यांचं म्हणणं ऐकलं. सरकारसमोर प्रश्न मांडणार असल्याचं आश्वासनही त्यांनी हमालांना दिलं, यानंतर राहुल गांधींनी हमालांसोबत सेल्फीही घेतला.
Published at : 21 Sep 2023 01:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
