एक्स्प्लोर
Skin Care Tips : उन्हात फिरल्याने त्वचा काळी पडली आहे का? 'हे' स्किन केअर रूटीन फॉलो करा,चेहऱ्यावर दिसू लागेल ग्लो
उन्हात फिरल्याने त्वचा काळी पडली असेल तर स्किन केअर रूटीन फॉलो करा.

Skin Care Tips
1/10

अनेकदा आपण चेहऱ्याला स्कार्फ वगैरे काहीच न बांधता तसेच बाहेर पडतो. यामुळे चेहरा काळा पडतो. चेहऱ्याची चमक पूर्ण निघून जाते आणि चेहरा निस्तेज दिसू लागतो.
2/10

अशा वेळी थोडा वेळ काढून केलेले स्किन केअर रूटीन कामी येऊ शकते आणि चेहऱ्याचा ग्लो परत येऊ शकतो.त्याकरता काय करावे पाहा.
3/10

खूप उन्हात बाहेर पडले की, त्वचेवर टॅनिंग आणि सनबर्न सारखी समस्या त्रास देऊ लागते. यावर पर्याय म्हणून आपण अनेकदा ब्यूटी प्रोडक्ट्स वापरतो. मात्र त्याने त्वचा आणखीन खराब होते.
4/10

चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स घालवण्याकरता स्क्रबचा वापर करतात. यामुळे त्वचा मोठ्या प्रमाणात सेंसिटिव्ह होते. त्यामुळे स्क्रबचा वापर शक्यतो करणे टाळा.
5/10

अनेकदा आपण योग्य ती सनस्क्रीन निवडत नाहीत. त्यामुळे सनस्क्रीन लावून देखील त्वचेवर टॅनिंग आणि सनबर्न होतेच. अशा वेळी सनस्क्रीनची निवड करताना पूर्ण विचार करून मगच खरेदी करावे.
6/10

ज्यावेळी त्वचा काळी पडलेली असते,त्यावेळी व्हिटामिन सी चा वापर करावा. त्याकरता व्हिटामिन सी असलेली फेस क्रीम, फेस वॉश आणि फेस सीरम वापरावे.
7/10

चेहऱ्याचा काळेपणा लपवण्याकरता तुम्ही मेकअप करू शकता. याकरता लाईट मेकअप हा तुमच्याकरता चांगला पर्याय असू शकतो.
8/10

काळेपणाची समस्या दूर करण्याकरता दिवसातून अनेक वेळा चेहरा धुवा. यामुळे काळेपणा दूर होण्यास मदत होऊ शकते.
9/10

हळद आणि बेसन याचा फेसपॅक तुमच्या कामी पडू शकतो. याकरता दोन चमचे बेसन आणि थोडी हळद मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा. नंतर चेहरा धुवा.
10/10

टोमॅटो आणि दही पॅक त्वचेवरील सन टॅन काढून टाकते. 2 चमचे दह्यात एक चमचा टोमॅटोचा रस मिसळा आणि अर्ध्या तासानंतर चेहरा धुवा.
Published at : 05 Oct 2023 06:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
भारत
भारत
शेत-शिवार
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
