एक्स्प्लोर
Pumpkin Seeds : रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत वाचा भोपळ्याच्या बियांचे फायदे
Health Tips : भोपळ्याच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडेंट, दाहक-विरोधी, अँटीमाइक्रोबायल, संधिवात-विरोधी आणि मधुमेह-विरोधी गुणधर्म असतात.

Pumpkin Seeds
1/8

भोपळ्याच्या बिया आणि त्यांचे तेल त्वचेसाठी फायदेशीर आहे. बियांमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि सी कोलेजनचे उत्पादन वाढवतात. कोलेजन जखम भरण्यास मदत करते.
2/8

या बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड चांगल्या प्रमाणात असतात. भोपळ्याच्या बियामध्ये जस्त भरपूर असते. यामुळे केसगळतीपासून सुटका मिळते.
3/8

भोपळ्याच्या बिया निरोगी चरबी, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहेत. भोपळ्याच्या बिया वजन नियंत्रित करू शकतात
4/8

भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने शरीरातील व्हिटॅमिन ई आणि झिंकची कमतरता भरून निघते. ‘व्हिटॅमिन ई’ त्वचेच्या आरोग्यासाठी लाभदायक असते. या जीवनसत्त्वामुळे त्वचा निरोगी आणि सुंदर राहण्यास मदत मिळते.
5/8

शारीरिक समस्या दूर करण्यासाठी आपल्या आहारामध्ये झिंकयुक्त फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते. यामुळे शरीराच्या आतील बाजूस आलेली सूज दूर होण्यास मदत मिळते.
6/8

भोपळ्याच्या बियांमध्ये अँटी व्हायरल प्रोपर्टीज आहेत. यामुळे आपल्या आरोग्याचं ताप, सर्दी-खोकल्यापासून संरक्षण होण्यास मदत मिळते.
7/8

प्रत्येक दिवशी दोन ते तीन चमचे भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळू शकते.
8/8

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 30 Sep 2022 03:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
