एक्स्प्लोर
krishnam Raju : टॉलिवूडचे 'रिबेल स्टार' अभिनेते कृष्णम राजू यांचे निधन; राधे श्याम ठरला शेवटचा चित्रपट!
कृष्णम राजू यांनी वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. टॉलिवूडचे 'रिबेल स्टार' अशी कृष्णम राजू यांची ओळख होती.

(फोटो सौजन्य :uvkrishnamraju/इंस्टाग्राम)
1/10

krishnam Raju : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कृष्णम राजू (krishnam Raju) यांचे निधन झाले आहे. (फोटो सौजन्य :uvkrishnamraju/इंस्टाग्राम)
2/10

कृष्णम राजू यांनी वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. टॉलिवूडचे 'रिबेल स्टार' अशी कृष्णम राजू यांची ओळख होती.(फोटो सौजन्य :uvkrishnamraju/इंस्टाग्राम)
3/10

त्यांनी 180 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. राधे श्याम हा त्यांचा शेवटचा चित्रपट. कृष्णम राजू यांनी सामाजिक, कौटुंबिक, रोमँटिक, थ्रिलर कथानकावर आधारित असणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केले. (फोटो सौजन्य :uvkrishnamraju/इंस्टाग्राम)
4/10

1996 मध्ये रिलीज झालेल्या 'चिलाका गोरनिका' या चित्रपटामधून कृष्णम राजू यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. (फोटो सौजन्य :uvkrishnamraju/इंस्टाग्राम)
5/10

कृष्णम राजू हे आंध्र प्रदेश सरकारच्या नंदी पुरस्काराचे दोन वेळा मानकरी ठरले. कृष्णम राजू यांना 1986 मध्ये 'तंद्र पापरायुडू' चित्रपटासाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. (फोटो सौजन्य :uvkrishnamraju/इंस्टाग्राम)
6/10

2006 मध्ये त्यांना फिल्मफेअर साऊथचा 'लाइफटाइम अचिव्हमेंट' पुरस्कार मिळाला. त्यांच्या 'अमरा दीपम', 'सीता रामुलू', 'कटकटला रुद्रैया' या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. (फोटो सौजन्य :uvkrishnamraju/इंस्टाग्राम)
7/10

अभिनेता निखिल सिद्धार्थनं ट्वीट शेअर करुन कृष्णम राजू यांना श्रद्धांजली वाहिली.(फोटो सौजन्य :uvkrishnamraju/इंस्टाग्राम)
8/10

तसेच कृष्णम राजू यांच्या चाहत्यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. (फोटो सौजन्य :uvkrishnamraju/इंस्टाग्राम)
9/10

कृष्णम राजू यांनी 1991 मध्ये नरसापुरममधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. (फोटो सौजन्य :uvkrishnamraju/इंस्टाग्राम)
10/10

1999 च्या निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवार म्हणून त्यांनी विजय मिळवला. (फोटो सौजन्य :uvkrishnamraju/इंस्टाग्राम)
Published at : 11 Sep 2022 12:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
