Abu Azmi : माझ्या शब्दांचा विपर्यास केला, तरीही माझे शब्द आणि विधान मागे घेतो; औरंगजेबाबद्दल वक्तव्यावर अबू आझमी यांचे स्पष्टीकरण
Abu Azmi : माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला आहे. असे वक्तव्य करत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी(Abu Azmi) यांनी औरंगजेब (Aurangzeb) बद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

Abu Azmi : माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला आहे. औरंगजेब रहमतुल्ला अलेह बद्दल जे इतिहासकार आणि लेखक म्हणतात तेच मी बोललो आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केलेली नाही. पण तरीही माझ्या बोलण्याने कोणी दुखावले असेल तर मी माझे शब्द आणि माझे विधान मागे घेतो. असे वक्तव्य करत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी(Abu Azmi) यांनी औरंगजेब (Aurangzeb) बद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
या प्रकरणाचा राजकीय मुद्दा बनवला जात आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बंद करणे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचे नुकसान आहे असे मला वाटते. असेही आमदार अबू आझमी म्हणाले.
अबू आझमी यांच्या मुलाचा गोव्यात राडा
मुघल शासक औरंगजेबाचे कौतुक केल्याप्रकरणी समाजवादी पार्टीचे नेते आणि मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी वादात सापडले असताना, आता त्यांच्या मुलाने गोव्यात राडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. इंडिकेटर न दाखवता कारने दिशा बदलल्यामुळे कांदोळी येथे सोमवारी रात्री मोठा वाद झाला. याप्रकरणी पोलिसांनी अबू आझमींच्या मुलासह इतरांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. कळंगुट पोलिसांनी याप्रकरणी झीऑन फर्नांडिस, जोसेफ फर्नांडिस, फरहान आझमी, शाम आणि इतरांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १९४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी फरहान आझमीसह इतरांना चौकशीसाठी घेतल ताब्यात
दरम्यान, झालेल्या प्रकारानंतर पोलिसांनी फरहान आझमीसह इतरांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दरम्यान, बीएनएस ३५ अंतर्गत नोटीस जारी करुन त्यांना सोडण्यात आले. फरहान आझमी मर्सिडीज जी -वॅगन गाडीतून कांदोळी भागातून जात असताना त्यांच्या कारने न्यूटन सुपर मार्केट येथे इंडिकेटर न दाखवता वळण घेतले. यावरुन मोठा वाद झाला. स्थानिकांनी आझमी यांच्या कारभोवती एकत्र येत मोठा गोंधळ घातला. दरम्यान, आझमी यांनी त्यांच्याकडे परवाना असलेली बंदूक आहे असं सांगत बंदुकीचा धाक दाखवला, असा दावा केला जात आहे. यामुळे वाद आणखी चिघळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फरहान आझमी यांच्यासह आणखी काही जणांना ताब्यात घेतले. सुरुवातीला हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न देखील झाला. दरम्यान, कळंगुट पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत चारजणां विरोधात गुन्हा नोंद केला आहे. कळंगुट पोलिस अधिक तपास करतायेत.
हे ही वाचा























