Budh Yam Yuti 2025 : अवघ्या 24 तासांनंतर बुध-यमाचा जुळून येणार शक्तिशाली योग, 'या' 3 राशींचे सुरु होणार 'अच्छे दिन', चौफेर होणार धनलाभ
Budh Yam Yuti 2025 : वैदिक पंचांगानुसार, 5 मार्च रोजी दुपारी 12 वाजून 01 मिनिटांनी बुध आणि यम ग्रह एकमेकांच्या 60 डिग्रीवर असतील. यामुळे त्रिएकादश लाभ होणार आहे.

Budh Yam Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. याचा राज्यासह देशभरातली लोकांवर शुभ-अशुभ परिणाम होतो. ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह (Mercury) जवळपास दोन वर्षांनंतर राशी परिवर्तन करतात. बुध ग्रह सध्या मीन राशीत विराजमान आहे.
वैदिक पंचांगानुसार, 5 मार्च रोजी दुपारी 12 वाजून 01 मिनिटांनी बुध आणि यम ग्रह एकमेकांच्या 60 डिग्रीवर असतील. यामुळे त्रिएकादश लाभ होणार आहे. याचा 3 राशींवर कसा परिणार होणार ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, धन-संपत्तीत चांगली वाढ पाहायला मिळेल. कुटुंबियांबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी त्रिएकादश योग फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या धन भावात बुध ग्रह विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, तुम्हाला वडिलोत्पार्जित संपत्तीतून चांगला लाभ मिळेल. भावा-बहिणींमधील संबंध चांगले राहतील. इतकंच नव्हे तर, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. अनेक क्षेत्रांत तुम्हाला चांगला धनलाभ मिळेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभ असणार आहे. विविध क्षेत्रांमधून तुम्हाला चांगला धनलाभ होईल. तसेच, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तुमच्या आयुष्यात अनेक महत्त्वाचे बदल घडतील. तसेच, वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहील. नोकरदार वर्गातील लोकांना उच्च पदाची नोकरी मिळू शकते. पार्टनरबरोबर नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. एकंदर हा काळ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















