ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 04 March 2025
ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 04 March 2025
संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा...मुंडेंना कार्यमुक्त केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा...रात्रीच राजीनाम्याचा निर्णय झाल्याच्या एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब...
राजीनामा द्या, नाहीतर राज्यपालांना पत्र लिहून हकालपट्टी करावी लागेल...
राजीनाम्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या मुंडेंना फडणवीसांची तंबी, सूत्रांची माहिती...
मुंडेंचा राजीनामा नैतिकतेच्या मुद्यावरुन, राष्ट्रवादी काँग्रेसची माहिती...तर वैद्यकीय कारणावरून राजीनामा, स्वतः धनंजय मुंडेचा ट्वीटद्वारे दावा... नैतिकतेवरून विरोधकांचा हल्लाबोल...
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं नेमकं खरं कारण काय?, तसंच दोन महिन्यांनी अधिवेशनाच्या काळातच या गोष्टी बाहेर कशा आल्या?, उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल
धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाची शपथच व्हायला नको होती, राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया...राजीनामा आधीच झाला असता तर पुढच्या गोष्टी टळल्या असत्या, पंकजा मुंडेंचं मत...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, आदित्य ठाकरे, रोहित पवारांची मागणी...खंडणीची बैठक सातपुडा बंगल्यावर झाली होती, सुरेश धस यांचा आरोप.



















