एक्स्प्लोर

Rahu Ketu Transit 2025: सावधान! होळीनंतर राहू केतूचा कहर, 'या' 2 राशींच्या लोकांचं मोठं नुकसान होणार? नोकरीत अडचण उद्भवणार?

Rahu Ketu Transit 2025: ज्योतिषांच्या मते, राहू आणि केतूच्या नक्षत्र बदलामुळे दोन राशीच्या लोकांच्या जीवनात समस्या येऊ शकतात. या राशींना याचा फटका सहन करावा लागू शकतो,

Rahu Ketu Transit 2025: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून 2025 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. या वर्षात अनेक राशींना ग्रह ताऱ्यांच्या हालचालींचे विविध परिणाम पाहायला मिळतात, ज्योतिषशास्त्रानुसार, तसं पाहायला गेलं तर सर्व ग्रह विशिष्ट वेळेनंतर राशी आणि नक्षत्र बदलतात. सर्व राशींवर याचा मोठा प्रभाव पडतो. काहींना शुभ फळ मिळते तर काहींना अशुभ फळ मिळते. मात्र आता होळीनंतर पापी ग्रह ज्यांना म्हटले जाते, असे राहू-केतू आपली स्थिती बदलणार आहेत. ज्याचा दोन राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जाणून घेऊया कोणत्या त्या राशी आहेत?

राहू-केतू नक्षत्र बदलाचा दोन राशींना फटका

ज्योतिषशास्त्रानुसार होळीनंतर 16 मार्चला राहू आणि केतू हे पापी ग्रह नक्षत्र बदलतील. काही राशींवर त्याचा सकारात्मक प्रभाव पडेल आणि इतरांवर नकारात्मक प्रभाव पडेल. ज्योतिषांच्या मते, राहू आणि केतूच्या नक्षत्र बदलामुळे दोन राशीच्या लोकांच्या जीवनात समस्या घेऊन येऊ शकतो. दोन राशींना याचा फटका सहन करावा लागू शकतो, या राशीच्या लोकांना पैसा आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया कोणत्या आहेत ती राशी?

राहू-केतूचे नक्षत्र कधी बदलेल?

पंचांगानुसार, सध्या राहू 12 जानेवारी 2025 पासून उत्तरा भाद्रपदाच्या पहिल्या भावात प्रवेश करत आहे आणि 14 मार्च, 2025 च्या होळीनंतर, 16 मार्च रोजी संध्याकाळी 6.50 वाजता पूर्वा भाद्रपद चौथ्या भावात राहूचे संक्रमण होईल. यावेळी केतू उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या द्वितीय स्थानात प्रवेश करेल.

कन्या

ज्योतिषशास्त्रानुसार, राहू आणि केतूच्या नक्षत्रातील बदलाचा कन्या राशीच्या लोकांवर मोठा प्रभाव पडू शकतो. यावेळी कन्या राशीच्या लोकांना काम आणि नोकरीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यावेळी कन्या राशीच्या लोकांची काही अनिष्ट ठिकाणी बदली होऊ शकते. याशिवाय पदोन्नती आणि वेतनवाढीमध्ये अडथळे येऊ शकतात. राहू केतू नक्षत्राच्या स्थितीत बदल झाल्यामुळे कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बिघडू शकते आणि मानसिक अस्वस्थता देखील येऊ शकते.

मीन

ज्योतिषशास्त्रानुसार, बृहस्पतिच्या राशीच्या मीन राशीच्या लोकांचे जीवन देखील राहू आणि केतूच्या नक्षत्रांमध्ये बदलामुळे प्रभावित होऊ शकते. यावेळी मीन राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार टाळावेत. व्यवसायात कमी फायदा होईल, कामाच्या ठिकाणी कोणाशी मतभेद होऊ शकतात. यावेळी मीन राशीच्या लोकांनी प्रवास करताना आणि वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी अन्यथा ते अपघाताला बळी पडू शकतात.

हेही वाचा>>>

Shani Dev: 'या' 3 राशींच्या लोकांनो बिनधास्त व्हा! गुरूच्या नक्षत्रात शनिची एंट्री, करिअरमध्ये मोठे यश, नोकरीत पगारवाढ, उत्पन्नाचे नवे मार्ग मिळणार

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 August 2026: आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Shravan 2026 Wishes: श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
Shravan 2026: उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
Hindu Religion: देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...
देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget