एक्स्प्लोर
या अभिनेत्रींनी धर्माची भिंत ओलांडून मुस्लिम व्यक्तीसोबत बांधली लग्नगाठ, पण काही वर्षांतच घटस्फोट
Bollywood Actresses : अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी प्रेमासाठी धर्माची भिंत ओलांडून मुस्लिम व्यक्तीशी लग्न केलं. मात्र, काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. या अभिनेत्रींची यादी जाणून घ्या.

Bollywood Actresses Who Got Divorce with Muslim Husband
1/8

बॉलीवूडमधील अनेक सौंदर्यवतींनी प्रेमविवाह केले. अनेक हिंदू अभिनेत्रींनी मुस्लिम जोडीदार निवडले. आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर या अभिनेत्रींना खूप विरोध सहन करावा लागला पण, त्यांनी कोणाचीही पर्वा केली नाही. मात्र, काही वर्षांनंतर यातील अनेक अभिनेत्रींचा घटस्फोट झाला.
2/8

उर्मिला मातोंडकर लग्नाच्या आठ वर्षानंतर पती मोहसिन अख्तरपासून विभक्त होणार असल्याची बातमी येत आहेत. उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन यांनी 2016 मध्ये लग्न केले. आता उर्मिलाने घटस्फोटासाठी याचिका दाखल केल्याची माहिती आहे.
3/8

मोहसीन अख्तर मीर हा मुस्लिम असल्यामुळे लग्नानंतर उर्मिला मातोंडकरला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. त्यातच दोघांच्या वयात 10 वर्षांचा फरक आहे. आता उर्मिला मातोंडकरने पतीपासून घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केल्याची माहिती आहे.
4/8

बॉलिवूडची फिटनेस आयकॉन मलायका अरोरा हिने अरबाज खानसोबत लग्न केलं. दोघेही बी-टाऊनचं प्रसिद्ध कपल होतं, अनेक वेळा हे इतरांसाठी कपल गोल सेट करायचे. चाहत्यांनाही त्यांची जोडी खूप आवडायची.
5/8

लग्नाच्या अनेक वर्षांनी मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट झाला. यांना अरहान खान नावाचा मुलगा आहे.
6/8

बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंहने तिच्यापेक्षा लहान असलेल्या सैफ अली खानशी लग्न केलं, मात्र त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत.
7/8

सैफ अली खान आणि अमृता सिंहचा 2004 मध्ये घटस्फोट झाला होता. नंतर सैफने करीना कपूरशी लग्न केलं. या दोघांनाही दोन मुलेही आहेत. तर अमृता सिंहने दुसरं लग्न केलं नाही.
8/8

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री संगीता बिजलानीने मुस्लिम क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केलं. मात्र, काही वर्षांनी ते परस्पर संमतीने वेगळे झाले. अझरपासून वेगळे झाल्यानंतर संगीताने दुसरं लग्न केलं नाही.
Published at : 26 Sep 2024 06:50 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
भारत
कोल्हापूर
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
