एक्स्प्लोर
Bollywood movies: बॉलिवूडला साऊथची भूरळ; 'या' साऊथ चित्रपटांच्या हिंदी रिमेकनं जिंकली प्रेक्षकांची मनं
Bollywood movies: साऊथ चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते.

Bollywood movies
1/8

साऊथ चित्रपटांमधील अॅक्शन सीन्स, डायलॉग्स आणि या चित्रपटांमधील गाणी प्रेक्षकांची मनं जिंकतात. साऊथ चित्रपटांचे अनेक हिंदी रिमेक्स करण्यात आले. जाणून घेऊयात अशा बॉलिवूड चित्रपटांबाबत जे साऊथ चित्रपटांचे रिमेक आहेत
2/8

साथिया हा चित्रपट अलैपायुथे या तमिळ चित्रपटाचा रिमेक होता, ज्याचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले होते. विवेक ओबेरॉय, राणी मुखर्जी यांनी या चित्रपटात काम केलं आहे.
3/8

हेरा फेरी हा 1989 मध्ये रिलीज झालेल्या रामजी राव स्पीकिंग या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. रामजी राव स्पीकिंग हा चित्रपट 1971 च्या सी द मॅन रन या चित्रपटावर आधारित होता.
4/8

प्रियदर्शनचा भूल भुलैया हा चित्रपट 1993 मध्ये रिलीज झालेल्या मणिचित्रथाझू या मल्याळम चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे.
5/8

गजनी हा 2005 मध्ये रिलीज झालेल्या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये आमिर खाननं काम केलं आहे.
6/8

प्रभू देवा दिग्दर्शित 'वॉन्टेड' या चित्रपटात सलमान खाननं काम केलं आहे. 2006 मध्ये रिलीज झालेल्या पोकिरी या तेलुगू चित्रपटाचा हा अधिकृत हिंदी रिमेक होता.
7/8

सलमान खान, करिश्मा कपूर, सुष्मिता सेन, अनिल कपूर आणि तब्बू यांचा बीवी नंबर 1 हा 1995 साली रिलीज झालेल्या साथी लीलावती या चित्रपटाचा रिमेक आहे.
8/8

कबीर सिंह हा चित्रपट अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात शाहिदनं प्रमुख भूमिका साकारली आहे.
Published at : 13 Jul 2023 06:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
