एक्स्प्लोर
आनंदाश्रू... IPL प्लेऑफमध्ये आरसीबीची एंट्री, नवऱ्याकडे पाहुन अनुष्का भावूक झाली

Anushka sharma emotion after RCB won
1/9

प्लेऑफ मधील एंट्रासाठी झालेल्या चेन्नई विरुद्ध आरसीबीच्या सामन्यात अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बाजी मारली. या विजयासह प्लेऑफमध्ये पोहोचणारी आरसीबी चौथी टीम ठरली आहे.
2/9

कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वात टीम आरसीबीने दमदार कामगिरी करत यंदाच्या आयपीएलमधील आपलं प्लेऑफ तिकीट फिक्ल केलं आहे.
3/9

महेंद्रसिंह धोनीचा संघ मानल्या जाणाऱ्या चेन्नईविरुद्ध आरसीबीची लढाई होती. चेन्नईला शेवटच्या षटकात विजयासाठी 17 धावा करायच्या होत्या. मात्र, चेन्नईच्या यश दयाळनं केवळ 7 धावाच केल्याने चेन्नईला पराभव पत्कारावा लागला.
4/9

आयपीएल हंगामात अनेकदा विराट कोहलीच्या नेतृत्त्वात आयपीएल चॅम्पियनशीपचे स्वप्न पाहिलेल्या आरसीबीच्या पदरी निराशाच आली आहे.
5/9

यंदाच्या हंगामात मात्र आरसीबीने स्वत:ला सिद्ध करत चॅम्पिनयशीप होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. त्यामुळेच, चेन्नईविरुद्धच्या विजयाचा आनंदी क्षण हा आरबीसीसाठी तितकाच भावुकही होता.
6/9

शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू पडल्यानंतर आरसीबीच्या खेळाडूंनी विजयाचा जल्लोष सुरु केला. त्यावेळी, स्टेडियममधून सामना पाहणाऱ्या अनुष्का शर्मासाठीही हा आनंदा क्षण ठरला.
7/9

आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहलीने मैदानात नेहमीच्यास्टाईलने हावभाव करत आनंद व्यक्त केला. मात्र, यावेळी, विराट काहीसा भावुकही झाल्याचं दिसून आलं.
8/9

विराटकडे पाहून अनुष्का शर्मानेही दोन हात उंचावत विजयाचा जल्लोष केला. यावेळी, तिच्या चेहऱ्यावरील भावुक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
9/9

नवऱ्याचा आनंद पाहून अनुष्काही भावुक झाली होती. स्टेडियममधून तिने टाळ्या वाजवून, हात उंचावून जल्लोष केल्याचं दिसून आलं.
Published at : 19 May 2024 01:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
