एक्स्प्लोर
In Pics : 29 वर्षांपूर्वी योगायोगानं मिळाला 'दिवाना', आज Shahrukh Khan आहे बॉलिवूडचा बादशाह

Feature_Photo_1
1/7

बॉलिवूडचा किंग खान आणि रोमान्सचा बादशाह म्हणून ओळख असलेल्या शाहरुख खानच्या जीवनात आजच्या दिवसाला मोठं महत्व आहे. शाहरुखला आज बॉलिवूडमध्ये 29 वर्षे पूर्ण झाली आहेत. (Photo: @iamsrk instagram)
2/7

आजच्या दिवशीच, 25 जून 1992 साली शाहरुखचा पहिला चित्रपट 'दिवाना' प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुखने आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप उमटवली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.
3/7

'दिवाना' या चित्रपटासाठी शाहरुखच्या आधी अरमान कोहलीला साईन करण्यात आलं होतं. परंतु काही दिवस चित्रिकरण झाल्यानंतर अरमान कोहलीने हा चित्रपट सोडला आणि तो शाहरुखला मिळाला. या चित्रपटात शाहरुखला सेकंड रोल मिळाला होता पण त्याच्या अभिनयाची चर्चा मोठी झाली
4/7

नंतर हा चित्रपट जबरदस्त हिट झाला. यातील शाहरुखची एन्ट्री आणि 'कोई ना कोई चाहिये' हे गाणं सुपर-डुपर हिट झालं. त्यानंतर 'बाजिगर' मध्ये त्याने निगेटिव्ह भूमिका साकारायचं धाडसं दाखवलं. पण या चित्रपटाने शाहरुखच्या करियरला यशाची दिशा दिली. (Photo: @iamsrk instagram)
5/7

'डर' चित्रपटातही त्याने निगेटव्ह भूमिका साकारली. ही भूमिका इतकी हिट झाली की त्यामुळे शाहरुखने बॉलिवूडमध्ये आपले स्थान पक्कं केलं. त्यानंतर शाहरुखने कधीही मागे वळून पाहिलं नाही.
6/7

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी फौजी, दिल दरिया, सर्कस तसेच वागले कि दुनिया या मालिकांमध्ये शाहरुख खानने काम केलं होतं. शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये आतापर्यंत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. 29 वर्षांनंतर आजही त्याची जादू कायम आहे. (Photo: @iamsrk instagram)
7/7

शाहरुखचे चाहते केवळ भारतातच नसून जगभरात पसरले आहेत. मानवतावादी कार्यातही शाहरुखने कोणताही गाजावाजा न करता मोठं योगदान दिलं आहे. (Photo: @iamsrk instagram)
Published at : 25 Jun 2021 09:26 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
विश्व
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
