एक्स्प्लोर
Mutual Fund : सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढणार
Mutual Fund SIP : भारतातील बाजार नियामक संस्था सेबीनं 250 रुपयांच्या एसआयपीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. यामुळं म्युच्यूअल फंडमधील गुंतवणूक वाढणार आहे.

250 रुपयांची एसआयपी लवकरच येणार
1/5

मुंबई : भारतीय बाजार नियामक संस्था सिक्यूरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या चेअरमन माधबी पुरी बुच यांनी 250 रुपयांची एसआयपी योजना सुरु करण्याची घोषणा केली. म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी छोट्या गुंतवणूकदारांसाठी यामुळं संधी निर्माण होईल.
2/5

माधबी पुरी बुच यांनी 250 रुपयांच्या एसआयपीबाबतची घोषणा स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटर्स सोबत बोलताना एका कार्यक्रमात केली. स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरपर्सन श्रीनिवासलू शेट्टी यांचे आभार मानले.
3/5

250 रुपयांची एसआयपी योजना म्युच्यूअल फंडच्या विस्तारामध्ये मोठी भूमिका बजावेल, असा विश्वास माधबी पुरी बुच यांनी व्यक्त केला.
4/5

म्युच्यूअल फंडमधील असेट अंडर मॅनेजमेंटची रक्कम गेल्या दहा वर्षात सहापटीनं वाढली आहे. 2014 मध्ये म्यूच्यूअल फंडमधील रक्कम 10.51 लाख कोटी होती. ती 31 डिसेंबरपर्यंत 66.93 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
5/5

2019 मध्ये म्युच्यूअल फंडमधील असेट अंडर मॅनेजमेंटची रक्कम 26.54 लाख कोटी होती.त्याच्या दुप्पट रक्कम 2024 पर्यंत झाली, अशा माहिती असोसिएशन फॉर म्युच्यूअल फंड्स इन इंडियानं दिली. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 11 Jan 2025 01:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
