गोवा, कोलकाता येथूनही या मूर्तींच्या ऑर्डर येत आहेत. ऑनलाईनही मूर्ती बूक केल्या जात आहेत. मूर्तीत सेंसर शिवाय विद्यूत रोषणाईदेखील करण्यात आली आहे. जी रिमोटने ऑपरेट केली जाते.
2/5
दरवर्षी पेक्षा गणेशमूर्तींची मागणी कमी आहे. मात्र लोक पहिल्यांदा अशा प्रकारची मूर्ती पाहत आहेत. आतापर्यंत अशा 2-3 मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. बूकींग सुरु आहेत म्हणून आणखी मूर्ती तयार करत असल्याचं चौधरी यांनी सांगितलं.
3/5
मूर्तीकाराने म्हटलं की, गणपती बाप्पा आपल्या सर्व समस्या दूर करतो. त्यामुळे आम्ही मूर्तीच्या आता शस्त्र म्हणून सॅनिटायझरचा वापर केला आहे. त्यामुळे गणपती बाप्पा कोरोना व्हायरस दूर करेल.
4/5
प्रांजल आर्ट्स सेंटरचे मूर्तीकार नितीन चौधरी यांनी म्हटलं की, दरवर्षी नवीन आणि आकर्षक बाप्पाच्या मूर्ती आम्ही बनवत असतो. यावेळी कोरोना पार्श्वभूमीवर सॅनिटाईज करणारी गणेश मूर्ती आम्ही तयार केली आहे. बाप्पाच्या मूर्तीमध्ये डिस्पेंसर लावण्यात आले आहेत. त्यातून सॅनिटायझरचा शिडकाव होतो.
5/5
येत्या दोन दिवसांनी म्हणजे 22 ऑगस्टला गणपतींची प्रतिष्ठापना होत आहे. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे गणपती उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ही बाब लक्षात घेत मुंबईतील घाटकोपर येथील एका मूर्तीकाराने बाप्पाची अशी मूर्ती बनवली जी भक्तांना आर्शीवाद देत त्यांना सॅनिटाईजही करणार आहे.