Vladimir Putin : सिक्रेट 'गर्लफ्रेंड' ते लग्झरी लाईफस्टाईल; रशिया राष्ट्रपती पुतीन यांच्याबद्दल 'या' गोष्टी माहितीयेत?
Vladimir Putin : जाणून घेऊयात पुतीन यांच्या संपत्तीबाबत आणि त्यांच्या लग्झरी लाईफस्टाईलबद्दल...
Vladimir Putin : रशियाने युक्रेनवर (Russia-ukarine) केलेल्या हल्ल्यामुळे आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन(Vladimir Putin) हे चर्चेत आहेत. पण या आधी देखील वेगवेगळ्या कारणांमुळे ते चर्चेत होते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांना माहित नसेल. पुतीन यांच्या संपत्तीबाबत आणि त्यांच्या लग्झरी लाईफस्टाईलबद्दल जाणून घेऊयात...
पुतीन यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ते या फोटोंमध्ये ते शिकार, मासेमारी, घोडेस्वारी, स्विमिंग करताना दिसतात. असे मानले जाते की ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. परंतु अजून याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. एका रिपोर्टनुसार, पुतीन यांचे नवे घर हे बकिंगहॅम पॅलेसपेक्षा दुप्पट जागेत बांधण्यात आलं आहे. त्यांच्याकडे अनेक विमाने आणि लग्झरी गाड्या आहेत.
पुतीन यांची संपत्ती
रिपोर्टनुसार, 2018 मध्ये पुतीन यांच्याकडे जवळपास 200 अरब डॉलरची संपत्ती होती. तसेच सेंट पीटर्सबर्ग येथे त्यांचे एक आलिशान घर आहे. 2011 ते 2016 दरम्यान त्यांच्याकडे 3.85 कोटी डॉलर एवढी संपत्ती होती. पुतीन हे त्यांच्याकडे असणाऱ्या महागड्या घड्याळांमुळे देखील चर्चेत असतात.
पुतीन यांची सिक्रेट गर्लफ्रेंड
पुतीन यांचे नाव अनेक मुलींसोबत जोडण्यात आलेलं आहे. स्वेतलाना क्रिव्होनोगिख आणि त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. माजी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती अलिना काबाएवासोबत देखील पुतीन यांचे नाव जोडले जात होते. रिपोर्टनुसार, 2004 च्या सुरूवातीला पुतीन यांनी आलिनाला डेट करण्यास सुरूवात केली. पण नंतर 1983 मध्ये ल्युडमिला शक्रेबनेवासोबत पुतीन यांनी लग्नगाठ बांधली. पुतीन यांना मारिया पुतीना आणि येकातेरिना पुतीना या दोन मुली आहेत. पुतीन हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलणे टाळतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : अखेर युद्धाला तोंड फुटले! रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा
- Russia Ukraine War : रशियाने युक्रेनच्या डोन्बास प्रांतावरच हल्ला का केला? जाणून घ्या कारण...
- Russia Ukraine War : रशियाचे युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश, भारताचं संयुक्त राष्ट्रात शांततेचं आवाहन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha