Russia Ukraine War : अखेर युद्धाला तोंड फुटले! रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा
Russia Ukraine Crisis : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनविरोधात लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. त्यामुळे आता युद्ध अटळ असल्याचे मानले जात आहे.
Russia Ukraine Crisis : रशियाने युक्रेनविरोधात लष्करी कारवाई करत असल्याची घोषणा केली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी याची घोषणा केली असल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिले आहे. रशियाने डोन्बास प्रांतात लष्करी कारवाई सुरू केली असल्याचे वृत्त आहे. रशियाच्या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांची काही खैर नाही, असा इशारा देखील रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. एएपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या सैन्याला इशारा देताना शरणागती पत्करण्यास सांगितले आहे. युक्रेनवर रशिया करत असलेल्या कारवाई कोणत्याही देशाने हस्तक्षेप त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असाही इशारा पुतीन यांनी दिला. युक्रेनची राजधानी कीवमध्ये गोळीबार आणि स्फोटाचे आवाज ऐकू आले असल्याचे वृत्त 'एएफपी' या वृत्तसंस्थेने दिले आहे.
युक्रेनमध्ये आणीबाणी
युक्रेनमध्ये बुधवारी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. रशियाचं सैन्य सीमारेषेजवळ येत असल्याने तसंच परिस्थिती आणखी चिघळत असल्याने बुधवारी (23 फेब्रुवारी) युक्रेनच्या सुरक्षा परिषदेने (Ukraine security council) हा निर्णय घेतला आहे.
ही आणीबाणी संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे. केवळ रशियन-समर्थित फुटीरतावाद्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या डोनेस्तक आणि लुहान्स्कच्या पूर्वेकडील प्रदेश वगळला आहे, याठिकाणी 2014 पासून आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे. ही आणीबाणीची स्थिती 30 दिवसांपर्यंत लागू असणार असून यामध्ये देशभरात सुरक्षायंत्रणा अधिक कडक करत वाहन तपासणी तसंच इत्यादी गोष्टी वाढवण्यात येतील. तसंच परिषदेच्या या मागणीला लागू होण्यापूर्वू संसदेची मंजुरी आवश्यक आहे. सुरक्षा परिषदेचे सचिव ओलेक्सी डॅनिलोव्ह यांनी ही माहिती दिली.
(सविस्तर वृत्त लवकरच)