(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia Ukraine War : रशियाचे युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश, भारताचं संयुक्त राष्ट्रात शांततेचं आवाहन
Russia Ukraine War : रशियाचे युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश दिले असल्याने युद्ध अटळ असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रात भारताने शांततेचं आवाहन केलं आहे.
Russia Ukraine War : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश दिले आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC - United Nations Security Council) सध्या युक्रेन संकटाबाबत युक्रेनवर आपत्कालीन सत्र आयोजित करत आहे. या संकटाला उत्तर देताना, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताचे राजदूत टी.एस. तिरुमूर्ती म्हणाले की, आम्हाला खेदाने म्हणावे लागेल की, हा तणाव कमी करण्यासाठी सर्व संबंधित आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून वेळीच योग्य पावले उचलली गेली नाहीत.
विशेष म्हणजे या आठवड्यात युक्रेनवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची ही दुसरी वेळ असेल. पुतिन यांनी म्हटले आहे की, रशियाची युक्रेनशी आक्रमण करण्याची कोणतीही योजना नाही, परंतु रशिया कोणत्याही धोक्याला त्वरित प्रतिसाद देईल.
परिस्थिती एका मोठ्या संकटात बदलण्याच्या मार्गावर : भारत
संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे की, आम्ही तात्काळ शांततेचे आवाहन करतो, परिस्थिती मोठ्या संकटात बदलण्याच्या मार्गावर आहे. ही परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली नाही तर ते सुरक्षेच्या दृष्टीने मोठी समस्या उद्धभवू शकते. सर्व पक्षांच्या सुरक्षेचा विचार केला पाहिजे. युक्रेनमधील ताज्या परिस्थितीत, विद्यार्थ्यांसह 182 भारतीय नागरिकांसह युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्स (UIA) चे एक विशेष विमान आज सकाळी 7:45 वाजता कीव येथून दिल्ली विमानतळावर उतरले.
युक्रेनकडून आणीबाणी जाहीर
दरम्यान, युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. संकटाच्या पार्श्वभूमीवर, युक्रेनने बुधवारी देशव्यापी आणीबाणी घोषित केली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) सध्या युक्रेन संकटाबाबत आपत्कालीन सत्र आयोजित करत आहे. युक्रेनवर चर्चा करण्यासाठी या आठवड्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची ही दुसरी वेळ असेल.
रशियाने युक्रेनमधून आपल्या राजनैतिक कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं
रशियाने युक्रेनमधील आपल्या सर्व राजनैतिक प्रतिष्ठानांमधून कर्मचारी बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. मॉस्कोचे कीवमध्ये दूतावास आणि खार्किव, ओडेसा आणि ल्विव्हमध्ये वाणिज्य दूतावास आहेत. टास न्यूजने म्हटले आहे की कीवमधील दूतावासाने पुष्टी केली आहे की, स्थलांतर सुरू झाले आहे.तर, कीवमधील असोसिएटेड प्रेसच्या छायाचित्रकाराच्या लक्षात आले की कीवमधील दूतावासाच्या इमारती समोरील ध्वजही आता खाली अतरवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : अखेर युद्धाला तोंड फुटले! रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा
- Russia Ukraine Conflict: युक्रेनमध्ये आणीबीणी जाहीर, गंभीर परिस्थितीमुळे युक्रेन सुरक्षा परिषदेचा निर्णय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha