Nobel Prize : नोबेल पुरस्काराचा इतिहास काय सांगतो? जाणून घ्या पुरस्काराचं स्वरुप कधी जाहीर केला जातो
Nobel Prize : दरवर्षी ऑक्टोबर महिना आला की, नोबेल पुरस्काराचे वेध लागतात. सहा दिवस चालणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात सहा पुरस्कार दिले जातात.
Nobel Prize : नोबेल पारितोषिक (nobel prize) हा जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. सोमवारपासून यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारासाठी जगभरातील शास्त्रज्ञ, लेखक, अर्थशास्त्र तज्ज्ञ यांची निवड केली जाते. सोमवारी वैद्यकीय क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आज भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर होणार आहे.
दरवर्षी ऑक्टोबर महिना आला की, नोबेल पुरस्काराचे वेध लागतात. सहा दिवस चालणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात सहा पुरस्कार दिले जातात. बुधवारी (5 ऑक्टोबरला) रसायनशास्त्र, गुरुवारी (6 ऑक्टोबरला) साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर होणार आहेत. जर शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा शुक्रवारी (7 ऑक्टोबर) होणार आहे. तर अर्थशास्त्रातील नोबेल सोमवारी (10 ऑक्टोबर) ला देण्यात येणार आहे.
नोबेल पुरस्काराचा इतिहास
नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यू आधी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका ट्रस्टला दान केला होता. त्यांची इच्छा होती की या पैशांच्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जावा. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडिश बँकेत जमा आहे. या संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात. पहिल्या नोबेल शांती पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आला होता.
पुरस्काराचे स्वरुप काय आहे?
नोबेल पुरस्कार विजेत्यांना सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्रासह एक कोटी क्रोनोर (जवळपास नऊ लाख डॉलर) रक्कम देण्यात येते. दरवर्षी 10 डिसेंबरला पुरस्काराचे वितरण करण्यात येते. 10 डिसेंबर 1896 साली अल्फ्रेड नोबेल यांचे निधन झाले होते. 1901 ते 2021 या कालावधीत आतापर्यंत 609 जणांना नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.
नोबेल पुरस्कारासाठी कोणाला अर्ज करता येतो?
जगभरातून हजारो लोक नोबेल पुरस्कारासाठी अर्ज केले जातात. यामध्ये प्राध्यापक, नोबेल समितीचे सदस्य, माजी नोबेल पुरस्कार विजेत्यांचा समावेश असतो. दरम्यान पुरस्कारासाठी आलेले अर्जाची माहिती ही 50 वर्षापर्यंत गुप्त ठेवले जातात.
नॉर्वेचा काय संबंध आहे?
शांततेचा नोबेल पुरस्कार नॉर्वेमधील ओस्लो येथे देण्यात येतो. तर इतर क्षेत्रातील पुरस्कार हे स्वीडन येथे देण्यात येतात. अशी अल्फ्रेड नोबेल यांची इच्छा होती. असे करण्यामागचे काही विशिष्ट कारण समोर आलेले नाही.