एक्स्प्लोर

Cigarettes Banned : 'या' देशात तरुणांच्या धूम्रपानावर बंदी; नियमांचं उल्लंघन केल्यास होणार लाखोंचा दंड

New zealand Banned Cigarettes : सिगारेटचे व्यसन कमी करण्यासाठी न्यूझीलंड सरकारने विशेष कायदा लागू केला आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर 2025 पर्यंत धूम्रपानाचे प्रमाण कमी होईल, असा सरकारचा विश्वास आहे.

New zealand Banned Cigarettes : धूम्रपान (Smoking) आरोग्यासाठी किती हानिकारक आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. याच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करून आता न्यूझीलंडने (New zealand) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता तरूणांच्या धूम्रपानावर बंदी येणार आहे. याबाबत सरकारने मंगळवारी संसदेत एक कायदा मंजूर केला आहे. या कायद्यानुसार न्यूझीलंडच्या (2009 नंतर जन्मलेल्या) येणाऱ्या पिढ्यांना तंबाखू खरेदीवर बंदी घालण्यात येणार आहे. सरकारच्या मते, पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित करणारा हा जगातील पहिला कायदा असेल.

नवीन कायद्यांमध्ये 1 जानेवारी 2009 किंवा त्यानंतर जन्मलेल्या कोणालाही तंबाखू विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोणीही उल्लंघन करताना आढळल्यास NZ$150,000 ($95,910) पर्यंत दंड होऊ शकतो. याव्यतिरिक्त, धूम्रपान बंदी व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यासाठी लागू राहील असेही कायद्यात नमूद करण्यात आले आहे. 

निकोटीनचे प्रमाणही कमी होणार

न्यूझीलंडमध्ये संमत झालेल्या या कायद्यानुसार धूम्रपानासाठी वापरल्या जाणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांमधील निकोटीनचे प्रमाणही कमी केले जाणार आहे. एका निवेदनात, सहयोगी आरोग्य मंत्री डॉ. आयशा वेरल यांनी सांगितले की, हा कायदा धूरमुक्त भविष्याकडे प्रगतीला गती देईल. 

त्या पुढे म्हणाल्या की, "हा कायदा संमत झाल्यानंतर हजारो लोक अधिक काळ जगतील, निरोगी आयुष्य जगतील आणि आरोग्य व्यवस्था अधिक चांगली होईल. याचं कारण असं की, धूम्रपानामुळे होणारे आजार जसे की, कर्करोग (Cancer), हृदयविकाराचा झटका (Heart Attack, पक्षाघात (Paralysis) यांसारख्या आजारांवर उपचार करणे खूप महाग आहे. 2023 च्या अखेरीस तंबाखू विक्रीसाठी परवाना असलेल्या किरकोळ विक्रेत्यांची संख्या 6,000 वरून 600 पर्यंत कमी केली जाईल." असे सांगण्यात आले आहे. 

धूम्रपान विरोधी कडक कायदे करणार

सहयोगी आरोग्य मंत्री डॉ. आयशा वेरल यांनी म्हटल्याप्रमाणे, न्यूझीलंड 2025 पर्यंत देशाला धूम्रपानमुक्त करण्यासाठी धूम्रपान विरोधी कायदे आणखी कडक करणार आहे. भूतानमध्ये 2010 मध्येच सिगारेटच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. त्याचप्रमाणे न्यूझीलंडमध्ये धूम्रपानविरोधी कडक कायदे असतील.

न्यूझीलंडमधील प्रौढ धूम्रपान करणाऱ्यांची संख्या गेल्या दशकात निम्म्या पटींनी कमी होऊन ही संख्या आठ टक्क्यांवर आली आहे. गेल्या वर्षी 56,000 लोकांनी धूम्रपान सोडले आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

Artificial Uterus Facility द्वारे बाळाच्या डोळ्यांचा आणि केसांचा रंगही ठरवता येणार; EctoLife कंपनीचा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan: भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Heeramandi : 'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
Ghatkopar Hoarding Falls: अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
Weather Updates: पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 80 : आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines  : 8 AM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGhatkopar hoarding collapse :घाटकोपर पेट्रोल पंपावर महाकाय बॅनर कोसळला, मृतांचा आकडा 14 वर:ABP MajhaTOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 14 मे 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Heeramandi : 'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
Ghatkopar Hoarding Falls: अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
Weather Updates: पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
Shah Rukh Khan : शाहरुख खानने 'या' चित्रपटात दिलाय इंटिमेट सीन; पण चाहत्यांना कधीच पाहता येणार नाही 'हा' सिनेमा
शाहरुख खानने 'या' चित्रपटात दिलाय इंटिमेट सीन; पण चाहत्यांना कधीच पाहता येणार नाही 'हा' सिनेमा
World Most Expensive Movie : जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
Embed widget