World No-Tobacco Day 2022 : धूम्रपान करणाऱ्यांनो वेळीच सावध व्हा! तुम्हालाही अंधत्व येऊ शकतं
World No-Tobacco Day 2022 : Golbal Adult Tobacco Survey नुसार जवळपास 267 दशलक्ष लोक तंबाखूचे सेवन करतात.
World No-Tobacco Day 2022 : खरंतर कोणत्याही गोष्टीचं व्यसन हे वाईटच. मग ते धूम्रपान असो किंवा मद्यपान. धूम्रपान करणाऱ्यांना धूम्रपान अचानक सोडणे कठीण आहे. मात्र, हळूहळू का होईना ही सवय सोडणे गरजेचे आहे. या संदर्भात ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्वे (Golbal Adult Tobacco Survey) नुसार, भारतात तंबाखूचे सेवन अगदी सामान्य झाले आहे. जवळपास 267 दशलक्ष लोक तंबाखूचे सेवन करतात. तंबाखूच्या व्यसनाचा परिणाम हृदय, श्वसनसंस्था यांच्यावर होत असला तरी अनेकांना हे माहित नही की धूम्रपान केल्यामुळे तुमच्या डोळ्यांवर परिणाम होऊन तुमची दृष्टीही कमी होऊ शकते. दरवर्षी 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन 2022 (World No-Tobacco Day) म्हणून पाळला जातो.
या संदर्भात मुंबई रेटिना सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विट्रेओरेटिनल सर्जन डॉ. अजय दुदानी म्हणतात की, ''धूम्रपानामुळे डोळ्यांना त्रास होण्याबरोबच जळजळ होऊ शकते. धूम्रपानामुळे तीन डोळ्यांचे आजार होण्याचा आणि ते अधिक बिकट होण्याचा धोका आहे आणि ते तीन आजार म्हणजे एएमडी, मोतीबिंदू आणि काचबिंदू. एएमडी रूग्णांमध्ये धूम्रपानामुळे रेटिनाला ऑक्सिडेटिव्ह नुकसान होते आणि मॅक्युलामधून ल्युटीन कमी होते. खरंतर, धूम्रपानामुळे एएमडी 10 वर्ष लवकर होऊ शकतो.''
धूम्रपानाचा डोळ्यांवर परिणाम होण्याची कारणे :
- धूम्रपानामुळे व्यक्तींमध्ये एज रिलेटेड मॅक्युलर डिजरेशन होण्याचा धोका वाढतो, ज्यामध्ये अत्यंत बारीक वस्तू पाहण्यास मदत करणा-या मॅक्युलाची (रेटिनाचा मध्यभाग) स्थिती अधिक बिकट होते.
- यामुळे अंधुक दिसणे, विकृती आणि दृष्टीच्या मध्यभागी ब्लाइण्ड स्पॉट्स अशी लक्षणे दिसून येतात.
- तंबाखू डोळ्यातील पडद्यामधील रक्तप्रवाहात व्यत्यय आणते आणि त्यामुळे मॅक्युलर डिजनरेशन होते.
- धूम्रपानामुळे होणा-या ऑक्सिडेशनचा मॅक्युला पेशींवरही परिणाम होतो.
यावर उपाय काय?
- एएमडी होण्याचा धोका कमी करण्याचा मार्ग म्हणजे धूम्रपान न करणे.
- रेटिनल आजारांमुळे दृष्टी कमी झाल्यास त्यावर उपचार होऊ शकत नाही. पण वेळेवर निदान केले तर रेटिनल आजारांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येऊ शकते.
यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे धूम्रपान करणाऱ्यांना धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत तीन ते चार पट अधिक धोका असतो. परंतु, धूम्रपान करणाऱ्यांबरोबर राहणारे आणि धूम्रपा न करणारे यांना एएमडी होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अशा लोकांच्या संपर्कात राहू नका. अशा बहुतांश केसेसमध्ये वेळेवर पुरेशी काळजी घेतली नाही तर कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते.
तसेच तंबाखूच्या धुराचा डोळ्यांभोवती असलेल्या उतींवर देखील परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे पापण्यांचा विकार होऊ शकतो आणि डोळ्यांखाली सूज येऊ शकते,'' असे पुण्यातील इनसाइट व्हिजन फाऊंडेशन येथील वैद्यकीय संचालक डॉ. नितीन प्रभुदेसाई म्हणाले.
धूम्रपानामुळे मधुमेहाचा धोका
''डायबेटिक रेटिनापॅथी असलेल्या रूग्णांनी धूम्रपान टाळावे, कारण भविष्यात जटिलतांमध्ये वाढ होऊ शकते. अशा स्थितीत धूम्रपानामुळे रूग्णांना त्यांच्या अगोदरच कमकुवत झालेल्या रक्तवाहिन्या आणि डोळ्यांमधील मज्जातंतू अधिक खालावण्याचा धोका निर्माण होतो.
मोतीबिंदू अंधत्वाचे मुख्य कारण :
खरंतर, मोतीबिंदू हे जगभरातील अंधत्वाचे मुख्य कारण आहे. मोतीबिंदू डोळ्यांतील पारदर्शक लेन्स अंधुक करते. असे निदर्शनास आले आहे की, धूम्रपान केल्याने ऑक्सिडेशनद्वारे लेन्समध्ये पेशी बदलू शकतात. तसेच, यामुळे लेन्समध्ये कॅडमियम सारखे हानीकारक धातू देखील जमा होऊ शकतात. यामुळे दृष्टी धूसर होते ज्यावर वेळीच उपचार केले नाही तर दृष्टीला सूज येते.
दृष्टी कमी होऊ नये यासाठी काय करावे?
- धूम्रपान सोडा.
- नियमितपणे डोळ्यांची तपासणी करा आणि उपचारांचे काटेकोरपणे पालन करा.
- हिरव्या पालेभाज्या, फळं, तसेच जीवनसत्त्व क,ई असलेले खाद्यपदार्थ खा.
- रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवा.
- सक्रिय राहा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Home Remedies For Piles: मूळव्याधाने त्रस्त आहात? आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा..
- Health Tips : यकृतासाठी या 5 गोष्टी आहेत वरदान; रक्तही होईल स्वच्छ
- Hiccup : पुरेसे पाणी पिऊनही वारंवार उचकी का येते? जाणून घ्या कारणे आणि उपाय
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )