(Source: ECI/ABP News/ABP Majha)
25 वर्षाच्या तरुणाला बेलफोर्टचा अजब सल्ला, म्हणाला 60 हजार डॉलर्सची नोकरी सोड! व्हिडीओ तुफान व्हायरल
नुकताच जॉर्डन बेलफोर्टने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये जॉर्डन बेलफोर्टने एका तरूणाला नोकरी सोडण्याचं धाडस करण्याचा सल्ला दिला.
Jordan Belfort : नोकरी मिळवून सेटल होण्याचे स्वप्न सर्वांचे असते. चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे सध्या अवघड झाले आहे. त्यामुळे मिळालेली नोकरी सोडण्याचा विचार फार कमी लोक करतात. नुकताच जॉर्डन बेलफोर्टने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये जॉर्डन बेलफोर्टने एका तरूणाला नोकरी सोडण्याचं धाडस करण्याचा सल्ला दिला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एका 25 वर्षाच्या तरुणाला जॉर्डन बेलफोर्टने चक्क 60 हजार डॉलर्सची नोकरी सोडण्याचा सल्ला दिला. जॉर्डन बेलफोर्टचा सल्ला ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले.
एका टिक-टॉक यूझरने जॉर्डन बेलफोर्टला प्रश्न विचारला होता. त्याचा प्रश्न होता, '9-5 वेळेत नोकरी करून 60 हजार डॉलर कमावणाऱ्या 25 वर्षांच्या मुलासाठी तुमचा सल्ला काय असेल?' त्यावर जॉर्डन बेलफोर्टने त्याला नोकरी सोडण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला, 'त्या नोकरीपेक्षा मोठा विचार करा आणि त्या पेक्षा चांगली नोकरी मिळवा. त्या नोकरीमुळे तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही. दुसऱ्याने दिलेल्या पगारावर फक्त ठरलेल्या वेळेत तुम्ही काम करत राहाल. '. हा सल्ला ऐकून नेटकऱ्यांना धक्का बसला. जॉर्डन बेलफोर्टच्या या व्हिडीओला 2 मिनीयलपेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत.
जॉर्डन बेलफोर्ट कोण आहे?
जॉर्डन बेलफोर्ट हा आधी स्टॉक ब्रोकरचे काम करायचा. त्याला 1999 मध्ये सिक्युरिटीज फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपानंतर दोषी ठरवण्यात आले होते. 22 महिने बेलफोर्टने तुरुंगवास भोगला होता. जॉर्डन बेलफोर्टच्या आयुष्यावर आधारित 'द व्हॉल्व ऑफ स्ट्रिट'(The Wolf Of Wall Street) हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला होता. लिओनार्डो डिकॅप्रियो या अभिनेत्याने या चित्रपटामध्ये जॉर्डन बेलफोर्टची भूमिका साकारली होती.
काय सांगताय? 24 वर्षाच्या महिलेने दिला एकाच वर्षात 21 मुलांना जन्म, शंभरचा आकडा गाठण्याचा निर्धार
जॉर्डनचे टिक टॉकवरील फॅन्स
जॉर्डन बेलफोर्टने 2019 साली टिक टॉकचे अकाऊंट ओपन केले. त्याला टिक टॉकवर 3 मिलीयन लोक फॉलो करतात. टिक टॉक व्हिडीओमधून जॉर्डन त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत असतो.
Viral Video : 'धाकड' पत्रकाराने नेत्याला धू-धू धूतलं? काय आहे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमागचं सत्य?