Yo Yo Honey Singh : 'जेव्हा तुझं नी माझं जुळं....' हनी सिंगनं गायलं थेट दादा कोडकेंचं गाणं; काळ्या गॉगलमधला मराठमोळा थाट तुफान व्हायरल!
Yo Yo Honey Singh Sung Dada Kondke Marathi Song : हनी सिंगने गायलं दादा कोंडकेंच्या सिनेमातील गाणं, ऐकून अभिमानाने छाती फुगेल!

Yo Yo Honey Singh Sung Dada Kondke Marathi Song : भारतातील लोकप्रिय गायकांपैकी एक असलेल्या यो यो हनी सिंगने प्रेक्षकांच्या मनात मोठं स्थान निर्माण केलंय. पंजाबी रॅपसह त्याने आणखी काही भाषांमध्ये रॅप आणि गाणी गायली. आता तर तो रॅप आवडणाऱ्या लोकांच्या गळ्यातील ताईत बनलाय. रॅप आवडणाऱ्या प्रत्येक भारतीयाला हनी सिंगची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. दरम्यान, आता त्याने एका कॉन्सर्टमध्ये मराठी गाणं गायलंय आणि मराठी बोलतानाही तो दिसलाय. दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या ढगाला लागली कळं, या सिनेमातील गाणं हनी सिंगने अक्षरश: प्रेक्षकांना मराठी भाषिक वाटावा, या पद्धतीने गायलंय.
पुण्यातील कॉन्सर्टमध्ये हनी सिंगने गायलं मराठी गाणं
काही दिवसांपूर्वी हनी सिंगचा महाराष्ट्रातील पुण्यात कॉन्सर्ट झाला होता. या कॉन्सर्टला अनेक मराठी कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी हनी सिंगने दादा कोंडकेच्या सिनेमातील हे गाणं गायलंय. शिवाय प्रक्षकांशी त्याने मराठीत संवाद साधलाय. उपस्थित प्रेक्षकांनी देखील हनी सिंगच्या गाण्यांना तुफान प्रतिसाद दिलाय. त्याचा मराठीत गाणी म्हणतानाचा आणि मराठीत संवाद साधतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. इन्स्टाग्रामवर सानिका नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.
View this post on Instagram
View this post on Instagram
हनी सिंग सिंगर तर आहेच शिवाय त्याने अनेकदा प्रोड्यूसर म्हणून देखील काम केलंय. गाण्याच्या दुनियेत प्रेक्षकांवर आजही त्याची जाही कायम आहे. गाण्याशिवाय त्याची स्टाईल आणि लॅविश लाईफ देखील चर्चेचा विषय असते. एक काळ होता तेव्हा हनी सिंगचं गाणं कित्येक जण गुणगुणत असायचे. दरम्यान, त्याच्या आयुष्यात अनेक चढउतार देखील आले. मात्र, पैसे कमावण्याच्या बाबतीत तो कोठेही मागे राहिला नाही. सध्याच्या घडीला हनी सिंगकडे 200 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं मीडिया रिपोर्ट्स सांगतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























