(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video : 'धाकड' पत्रकाराने नेत्याला धू-धू धूतलं? काय आहे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमागचं सत्य?
Viral Video : पत्रकाराने एका राजकीय नेत्याला मास्क न घालल्याने मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. जाणून घेऊया या व्हिडीओमागचं सत्य (Fact Check).
Viral Video : बिहारमध्ये पंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच एका नेत्याची मुलाखत घेणारा पत्रकार त्याला फोटो काढायच्या उद्देशाने एका घराच्या मागे नेतो आणि मास्क न लावल्याचं कारण सांगत धू-धू धूतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पण व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओच्या मागचे सत्य काही वेगळंच आहे.
या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे, न्यूज रिपोर्टर बिहारमधल्या सरपंचपदाच्या एका उमेदवाराला मास्क का घातलं नाही असा प्रश्न विचारतो. त्यावर कुठे आहे कोरोना असं निष्काळजी उत्तर त्या नेत्याकडून येतं. मग हा रिपोर्टर त्याला फोटो काढायचा आहे असं सांगत एका घराच्या मागे नेतो आणि धू-धू धूतो. अनेक नेटकरी हा व्हिडीओ खरा असल्याचं समजून फॉरवर्ड करत आहेत. पण हा व्हिडीओ केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनवण्यात आल्याचं समोर आलं आहे.
हा व्हिडीओ हर्ष राजपूत नावाच्या युट्युब चॅनेलवर सापडला आहे. 09 सप्टेंबर रोजी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला असून व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक सूचना देण्यात आली आहे की, "हा व्हिडीओ स्क्रिप्ट केलेला आहे आणि मनोरंजनाच्या उद्देशाने बनविला आहे. या व्हिडीओमधील भाषा अपमानास्पद असल्याने, यामध्ये अपशब्द वापरल्याने दर्शकांनी हेडफोन लावावा..!"
एकूण 3.04 मिनीटांच्या या व्हिडीओ मधील व्हायरल झालेला भाग हा 2.30 मिनीटांच्या नंतरचा आहे. व्हायरल व्हिडिओत दिसणारे लोक हे पत्रकार किंवा राजकीय नेते नसून कलाकार आहेत. हा व्हिडीओ हर्ष राजपूत नावाच्या तरुणाने बनविला असून तो बिहारच्या औरंगाबाद येथील आहे. त्याला बिहारमध्ये धर्मेंद्र धाकड म्हणून ओळखतात. धर्मेंद्र हे एक पात्र आहे जे तेथील लोकांचे मनोरंजन करत असतं. हर्ष राजपूत हा एक बिहारी तरुण असून तो लोकांच्या मनोरंजनासाठी यूट्यूब व्हिडीओ बनवितो.
पण व्हायरल झालेला हा व्हिडीओ अनेकांनी सत्य समजून फॉरवर्ड केला असून त्यावर कमेन्टचा पाऊस पडतोय. अनेकांनी अशा नेत्यांमुळेच आपल्या देशाची वाट लागल्याचं मत व्यक्त केलं आहे.
संबंधित बातम्या :