Chhaava Box Office Collection Day 32: भाईजानच्या 'सिकंदर'मुळे अडचणीत सापडणार 'छावा'? आतापर्यंत किती कोटींचा गल्ला?
Chhaava Box Office Collection Day 32: पाचव्या आठवड्याच्या शेवटी जबरदस्त कलेक्शन केल्यानंतर, विक्की कौशलचा 'छावा' नव्या आठवड्यात कसा परफॉर्म करतोय? हा चित्रपट पुन्हा काही विक्रम रचणार का?

Chhaava Box Office Collection Day 32: विक्की कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा' चित्रपटानं (Chhaava Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) एकामागून एक अनेक विक्रम मोडले. रिलीज होऊन एक महिना उलटल्यानंतरही 'छावा' बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. पण असं असलं तरीसुद्धा आता मात्र 'छावा'ची वाट काहीशी खडतर होण्याची शक्यता आहे. पाचव्या आठवड्याच्या शेवटी 'छावा'च्या कमाईत अचानक झालेली वाढ, सहाव्या आठवड्यात आल्यावर मात्र, घटल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता ईदनिमित्त सलमान खानचा (Salman Khan) सिकंदर (Sikandar Movie) रिलीज होणार आहे. त्यामुळे आता भाईजानच्या चित्रपटासमोर 'छावा'च्या कमाईत कमालीची घट पाहायला मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
'छावा' हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित होऊन 32 दिवस झाले आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होऊन 11 दिवस झाले आहेत. चित्रपटाच्या 32 व्या कलेक्शनशी संबंधित सुरुवातीचे आकडेही समोर आले आहेत. जाणून घेऊया की, चित्रपटानं आतापर्यंत किती कमाई केली? तसेच, मोठा विक्रम करण्यासाठी आता 'छावा'ला किती कोटींची कमाई करावी लागेल? जाणून घेऊयात सविस्तर...
'छावा' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
'छावा'नं गेल्या 31 दिवसांत दर आठवड्याला आश्चर्यकारक कमाई केली आहे. खाली तुम्ही चित्रपटाची हिंदी आणि तेलुगूमधील स्वतंत्र कमाई आणि त्यांची एकूण कमाई पाहू शकता.
- 'छावा'नं पहिल्या आठवड्यात हिंदीतून 225.28 कोटी रुपये कमावले.
- दुसऱ्या आठवड्यात चित्रपटानं 186.18 कोटी रुपये कमावले.
- तिसऱ्या आठवड्यात 84.94 कोटींचं कलेक्शन केलं.
- चौथ्या आठवड्यात ही कमाई 43.98 कोटी रुपयांवर आली.
- पाचव्या आठवड्याच्या शेवटी म्हणजेच, 31 व्या दिवशी, चित्रपटानं 22 कोटींची कमाई केली आणि हिंदीतून एकूण 562.38 कोटींची कमाई केली.
- या चित्रपटानं तेलुगूमध्ये पहिल्या आठवड्यात 11.80 कोटी आणि दुसऱ्या आठवड्यात 1.81 कोटी कमावले. आणि तेलुगू कलेक्शन 13.61 कोटी झाले.
- 31 दिवसांत हिंदी आणि तेलगू भाषेत चित्रपटाची एकूण कमाई 575.99 कोटी रुपये झाली.
- सॅकनिल्कच्या मते, छावाने आज सकाळी 10:40 वाजेपर्यंत, म्हणजेच 32 व्या दिवशी 2.65 कोटी रुपये कमावले आहेत आणि यासह, चित्रपटाचं एकूण कलेक्शन 578.64 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. दरम्यान, हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.
View this post on Instagram
'छावा'साठी 'हा' रेकॉर्ड तोडणं अवघड
'छावा'नं 'अॅनिमल' (553.87 कोटी) ला मागे टाकत बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये तिसरं स्थान पटकावलं आहे. पण ज्या पद्धतीनं चित्रपटाची कमाई घसरली आहे, त्यावरून असं दिसतंय की, या चित्रपटानं 'जवान' (640.25 कोटी) आणि 'स्त्री २' (597.99 कोटी) या दोन टॉप चित्रपटांचे रेकॉर्ड मोडण्याची आशा धुळीस मिळाली आहे.
'छावा'समोर सिकंदरचं आव्हान?
'छावा' प्रदर्शित झाल्यापासून, सिकंदरसारखा दुसरा कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. दरम्यान, आता जेव्हा सलमान खानचा सिकंदर ईदला प्रदर्शित होण्यास तयार आहे. अशा परिस्थितीत, असं मानलं जातंय की, छावाला स्त्री 2 चा विक्रम गाठण्यासाठी फक्त 10 दिवस शिल्लक आहेत.
दरम्यान, 'छावा' चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. विक्की कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, विनीत कुमार सिंह, आशुतोष राणा आणि डायना पेंटी फिल्ममध्ये महत्त्वाच्या भूमिकेत होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या या फिल्मची प्रोडक्शन कॉस्ट 130 कोटी रुपये आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























