एक्स्प्लोर

Nagpur Violence : नागपुरात कॉम्बिंग ऑपरेशन, 80 दंगलखोरांना अटक; दीड हजार सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर 

नागपूर पोलिसांच्या सायबर सेलने दंगल होत असताना सुमारे दीड हजार वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंटवर करडी नजर ठेवून 50 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि सुमारे 150 आक्षेपार्ह पोस्ट आयडेंटिफाय केल्याची माहिती आहे.

Ngpur Clash and Riots : उपराजधानी नागपूरमध्ये दोन गटात निर्माण झालेल्या तणावाच्या वतावरणामुळे (Nagpur Violence) संपूर्ण जिल्हा हादरला आहे. शहरातील महाल भागात संतप्त जमावाने केलेल्या समाजविघातकी कृत्यामुळे मोठी वित्तहानी झाली आहे. तर दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेमुळे अनेकांचे मोठे नुकसान झालं आहे. परिणामी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून काल (17 मार्च) उशीरापर्यंत कसोशीने प्रयत्न करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. तर रात्रभरात जवळ जवळ 80 दंगलखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

दीड हजार सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर 

दुसरीकडे, नागपूर पोलिसांच्या सायबर सेलने दंगल होत असताना सुमारे दीड हजार वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंटवर करडी नजर ठेवून 50 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि सुमारे 150 आक्षेपार्ह पोस्ट आयडेंटिफाय केल्याची माहिती आहे. या आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हिडिओच्या माध्यमातून डिजिटल माध्यमांवरही दंगल सदृश्य स्थिती निर्माण करण्याचा काहींनी प्रयत्न केल्याचं सायबर सेलला वाटतंय. या आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकणाऱ्या विरोधात कारवाई केली जाण्याची दाट शक्यता आहे.

अनेक वाहनांची तोडफोड, परिसरात संचारबंदी लागू

पुढे आलेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये सध्या तणावपूर्व शांतता आहे. किंबहुना महाल भागात पोलीसांचा तगडा बंदोबस्त असून परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर परिसरात संचारबंदी धारा 144 लागू करण्यात आली आहे. रात्रभर पोलिसांनी अटक सत्र सुरु करून जवळ जवळ  80 दंगलखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर जवळपास 1800 सोशल मीडिया सायबर पोलिसांकडून सर्च करण्यात आले आहे.

त्यातील 55 आक्षेपार्य विडिओ व मजकूर पसरवणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट आता  पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती पुढे आली आहे. मध्यरात्री महालनंतर नागपूरच्या हंसापुरी भागात देखील तणाव निर्माण झाला होता. यात 20 ते 22 वाहनांची जबर तोडफोड झाली आहे. मात्र सध्या नागपूरची परिस्थिती पूर्णतः पोलीसांच्या नियंत्रणात असल्याची ही माहिती आहे.

दगडांचा खच उचलला, प्रशासनाचे आवाहन  

तर जिथे काल रात्री दंगल उसळली होती त्या भागात रात्रभरात स्वच्छता मोहीम राबवून दगडांचा खच उचलला आहे. तसेच जाळपोळीचे चिन्ह ही हटविले आहे. प्रशासनाकडून परिस्थिती सामान्य करण्याचे प्रयत्न सध्या करण्यात येत आहे.या घटनेवर पोलीस प्रशासनानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. या प्रकरणात सामील असलेल्यांचा शोध घेतला जात आहे.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे नागपूर पोलिसांनी सांगितले आहे. दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी बाकावर बसलेल्या सर्वच पक्षांनी शांतता राखावी, कोणत्याही अफवांना बळी पडू नये तसेच पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. सोबतच नागपुरात अशी परिस्थिती नेमकी का निर्माण झाली? याचाही तपास व्हायला हवा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RR vs RCB Live Score Update : RCB चा टॉप ऑर्डर फुस्स! टिम डेविड बाद, पाटीदारकडून चमत्काराची अपेक्षा, जाणून घ्या live अपडेट्स
RR vs RCB LIVE IPL 2026 : RCB चा टॉप ऑर्डर फुस्स! टिम डेविड बाद, पाटीदारकडून चमत्काराची अपेक्षा, जाणून घ्या live अपडेट्स
सोने खरेदी करण्याची स्पर्धा! जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर?
सोने खरेदी करण्याची स्पर्धा! जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर?
RBI च्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल! जागतिक स्तरावर भारताची पेमेंट प्रणाली होणार मजबूत, जाणून घ्या सविस्तर माहिती
RBI च्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल! जागतिक स्तरावर भारताची पेमेंट प्रणाली होणार मजबूत, जाणून घ्या सविस्तर माहिती
Akola : धक्कादायक! गुप्तधन प्रकरणाचा तपास, अकोला पोलिसांकडून बुलढाणा पोलिसांवर हल्ला
धक्कादायक! गुप्तधन प्रकरणाचा तपास, अकोला पोलिसांकडून बुलढाणा पोलिसांवर हल्ला

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
Embed widget