Israel Hamas War : इस्रायल-हमास संघर्षाचा एक महिना! युद्धात आतापर्यंत 12000 हून अधिक जणांचा मृत्यू
Israel Gaza Attack : इस्रायल आणि हमास युद्धाला एक महिना पूर्ण झाला आहे. युद्धात हजारो पॅलेस्टिनी आणि इस्रायली लोक मारले गेले आहेत.
Israel Palestine Conflict : इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) युद्धाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. युद्धात आतापर्यंत 12000 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हजारो क्षेपणास्रांचा मारा करत या युद्धाला सुरुवात केली, त्यानंतर हमासचा खात्मा करण्याासाठी इस्रायलही युद्धात उतरलं. गेल्या महिन्याभरापासून हा संघर्ष सुरुच असून युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. इस्रायल आणि हमास युद्धात 10000 हजारहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याची माहिती गाझा पट्टीच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. इस्रायलकडून हमासला लक्ष्य करण्यासाठी गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले सुरु आहे. गाझातील नागरिकांची अवस्था फार बिकट झाली आहे. गाझातील नागरिकांना अन्न-पाणी मिळणंही कठीण झालं आहे.
आतापर्यंत 12000 हून अधिक जणांचा मृत्यू
युद्धात आतापर्यंत 12000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अल जझीराने अहवालात म्हटलं आहे की, इस्रायल आणि हमास युद्धात 10,022 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पॅलेस्टिनी आरोग्य अधिकार्यांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली असून त्यापैकी 4104 मुले आहेत. याशिवाय अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान,या संघर्षात सुमारे 2000 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायलचे गाझा पट्टीत जमिनीवर हल्ले
इस्रायलच्या गाझावरील हल्ल्याच्या विरोधात जगभर निदर्शने होत आहेत आणि युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, पण युद्धविराम होण्याची शक्यता दिसत नाही. हवाई हल्ल्यांनंतर इस्रायलने आता गाझा पट्टीत जमिनीवर हल्ले करण्यासही सुरू केली आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 7 ऑक्टोबरपासून गाझामध्ये सुमारे 10,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत. यासह आतापर्यंत सुमारे 25,000 लोक जखमी झाले आहेत. इतकंच नाही तर हजारो लोक बेपत्ता असल्याचा अंदाज आहे.
जीवनावश्यक वस्तूंसाठी गाझातील नागरिकांचा संघर्ष
या युद्धादरम्यान गाझा पट्टीत राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांना मूलभूत गोष्टींसाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. इस्रायली हल्ल्यामुळे गाझामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. अन्न आणि पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गाझामध्ये पोहोचलेली मानवतावादी मदत पुरेशी नाही, अससं जागतिक मदत संस्थांनी सांगितलं आहे. युनायटेड नेशन्सने संपूर्ण गाझामध्ये मानवतावादी मदत देण्याचं आवाहन केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :