एक्स्प्लोर

Israel Hamas War : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासला फंडींग कुठून मिळते? बजेट ऐकून थक्क व्हाल; मोसादच्या माजी एजंटचा गौप्यस्फोट

Hamas Funding : हमासला निधी नक्की मिळतो कुठून असा सवाल उपस्थित होत आहे. आता मोसादच्या एका माजी एजंटने हमासला मिळणाऱ्या निधीबाबत गौप्यस्फोट केला आहे.

Israel Hamas War : हमास आणि इस्रायल (Israel Palestine War) यांच्यातील युद्धाचा वणवा थांबवण्याची चिन्हे दिसत नाहीत. इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासकडून एकमेकांवर हल्ले सुरुच आहेत. हमास-इस्रायल युद्धादरम्यान काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामधील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हमासच्या निधीबाबत आहे. हमासला निधी नक्की मिळतो कुठून असा सवाल उपस्थित होत आहे. आता मोसादच्या एका माजी एजंटने हमासला मिळणाऱ्या निधीबाबत गौप्यस्फोट केला आहे. मोसाद (Mossad) ही इस्रायल सरकारची गुप्तचर यंत्रणा आहे.

दहशतवादी संघटना हमासला फंडींग कुठून मिळते? 

इस्रायली लष्कराने दावा केला आहे की, हमासने गाझामध्ये अनेक तळ उभारले आहेत आणि त्यांचे नेते हमासला परदेशातून निधी पाठवत आहेत. यासोबतच इस्रायलने दावा केला आहे की, एकीकडे गाझा पट्टीत मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. अशं असलं तरी हमासकडे इंधनाचा साठा आहे. हमासकडे 5 लाख लिटर इंधन असून ते जनतेला देण्यात येत नसल्याचा दावा इस्रायलने केला आहे. मोसादच्या एका माजी एजंटने याबाबत खुलासा केला आहे. दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत करण्यासाठी हमासचे वार्षिक बजेट 1.5 अब्ज पौंड असल्याचा मोठा गौप्यस्फोट मोसादच्या माजी एजंटने केला आहे.

हमासचं बजेट ऐकून तुम्हाला धक्का बसेल

माजी मोसाद एजंट उझी शाया यांनी खुलासा केला की, हमासचे आर्थिक प्रशासन तुर्कीमधील इस्तंबूलमधून चालवले जात आहे. तेथून हमासला मिळणाऱ्या बजेटवर नियंत्रण ठेवलं जातं. पॅलेस्टाईनी गट हमास दहशतवाद आणि हत्येला प्रोत्साहन देण्यासाठी बाहेरील देशातून निधी मिळतो. हमासला इराणमधून 200 दशलक्ष पौंड म्हणजेच भारतीय चलनामध्ये 2000 हजार कोटी रुपयांहून अधिक तर कतारमधून 400 दशलक्ष पौंड म्हणजेच 4000 कोटी रुपयांहून अधिक निधी येत असल्याचंही एजंटने सांगितलं आहे. स्थावर मालमत्तेसारखे व्यवसाय काळा पैसा पांढर्‍यामध्ये बदलण्यास मदत करतात.

'गाझामधील लोकांपर्यंत पैसा पोहोचत नाही'

हमासने 7 ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला चढवला. हमासने इस्रायलला केलेल्या हल्यात हमासने 1,400 इस्रायलींच हत्या केली. यानंतर काही दिवसांनी, बार्कलेजने पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासशी जोडलेलं बँक खातं गोठवलं. इस्रायलने डिसेंबर 2021 ते एप्रिल 2021 दरम्यान हमासची सुमारे 200 क्रिप्टो खाती बंद केली आहेत. 

मोसादच्या माजी एजंटचा गौप्यस्फोट

मोसादचे माजी एजंट शाया यांनी सांगितलं आहे की, "हमासकडे अमिराती, सुदान, अल्जेरिया आणि तुर्कस्तानमधील काही कंपन्या आहेत, ज्या रोख व्यवहारावर चालतात. हमास ही अतिशय छोटी दहशतवादी संघटना असल्याचे दिसत असलं तरी त्यांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे. हमासच्या बजेटचा एक मोठा भाग हमासच्या प्रमुखांकडे, त्यांच्या दहशतवादी आणि त्यांच्या सर्व कुटुंबांकडे आहे. तो गाझा लोकांपर्यंत पोहोचत नाही, जिथे बेरोजगारी जास्त आहे."

महत्त्वाच्या बातम्या

फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Embed widget