(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ayesha Malik : आयशा मलिक होणार पाकिस्तान सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश, जाणून घ्या, कोण आहेत आयशा मलिक?
आयशा मलिक (Ayesha Malik ) यांची पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती होणार आहे. आयशा मलिक या पाकिस्तानमधील महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या मानल्या जातात.
Ayesha Malik : पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशपदी आयशा मलिक (Ayesha Malik ) यांची नियुक्ती होणार आहे. आयशा मलिक यांच्या रूपाने पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्या महिला सरन्यायाधीश लाभल्या आहेत. पाकिस्तानच्या न्यायालयीन समितीने आयशा मलिक यांच्या नावाला परवानगी दिली असून आता संसदीय समितीत परवानगी मिळाल्यानंतर मलिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
कोण आहेत आयशा मलिक?
आयशा मलिक यांचा जन्म 3 जून 1966 रोजी झाला. त्यांनी कराची ग्रामर स्कूलमधून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कराचीच्या सरकारी महाविद्यालयातून त्यांनी आपली पदवी पूर्ण केली. त्याबरोबर त्यांनी लाहोर येथील कॉलेज ऑफ लॉ मधून कायद्याची पदवी पूर्ण केली. नंतर अमेरिकेतील हार्वर्ड लॉ स्कूलमधून एलएलएम पदवीधर झाल्या.
आयशा मलिक यांनी आपल्या करिअरची सुरुवात कराचीतील फखरुद्दीन जी इब्राहिम अँड कंपनीसोबत केली. तेथे त्यांनी 1997 ते 2001 अशी चार वर्षे काम केले. 1998-1999 मध्ये 'लंडन एच. गॅमन फेलो' म्हणून त्यांची निवड झाली.
2012 मध्ये आयशा मलिक यांची लाहोर हायकोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. आपल्या न्याय्य आणि निर्दोष निर्णयांमुळे चर्चेत राहणाऱ्या आयेशा यांच्या नियुक्तीला काही न्यायाधीश आणि वकिलांनी विरोध केला आहे. त्यांनी आयेशा यांची ज्येष्ठता आणि पदासाठीच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतु, या विरोधावर वुमन इन लॉ इनिशिएटिव्ह-पाकिस्तानने याआधीच्या 41 प्रसंगांचा उल्लेख करत सेवाज्येष्ठतेशिवाय करण्यात आलेल्या नियुक्त्या समोर आणल्या आहेत.
आयशा मलिक या पाकिस्तानमधील महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या मानल्या जातात. गेल्या वर्षी आयशा यांनी एक ऐतिहासिक निकाल दिला आहे. एका बलात्कार प्रकरणातील महिलांवरील वादग्रस्त खटला त्यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानचे मावळते सरन्यायाधीश मुशीर आलम यांनी सुप्रिम कोर्टातील पदोन्नतीसाठी आयशा मलिक यांच्या नावाची शिफारस केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Brazil boat incident : ब्राझीलच्या सुल मिनास धबधब्याजवळ खडक कोसळला, सात जणांचा मृत्यू तर नऊ जखमी
- Corona in Britain : ब्रिटनमध्ये कोरोनाचा विस्फोट, आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांचा बळी, सरकारचा बूस्टर डोस देण्यावर भर