Corona in Britain : ब्रिटनमध्ये कोरोनाचा विस्फोट, आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांचा बळी, सरकारचा बूस्टर डोस देण्यावर भर
Corona in Britain : ब्रिटनमध्ये कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर आतापर्यंत 1 लाख 50 हजारांहून अधिक लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती सरकारने दिली आहे.
Corona in Britain : ब्रिटनमध्ये कोविड-19 च्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहेत. तर कोरोनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटन हा युरोपमधील कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांपैकी एक आहे. ब्रिचृचन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर आतापर्यंत 1 लाख 50 हजारांहून अधिक लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. असे सांगितले जात आहे की रशिया हा एकमेव युरोपीय देश आहे जिथे मृतांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सध्या ब्रिटन सरकारकडून बुस्टर डोस देण्यावर भर दिला जात आहे.
ब्रिटनमध्ये दीड लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू
ब्रिटनमध्ये गेल्या आठवड्यात दररोज नोंदवलेल्या प्रकरणांच्या विक्रमी आकड्यांमध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांत 1,46,390 नवी कोरोना संसर्गाची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. रुग्णालयातील शेकडो कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या आणि क्वारंटाईन झाल्यामुळे रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. त्यामुळे रुग्णालयांवरील ताण वाढला आहे. दरम्यान, कर्मचार्यांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी लंडनच्या रुग्णालयांमध्ये सैन्य तैनात केले जात आहे.
लसीकरण आणि बूस्टर डोसवर भर
संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, ब्रिटनमध्ये कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या उद्रेकामुळे झालेल्या कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी लंडनच्या रुग्णालयांमध्ये सैन्य तैनात करेल. ब्रिचन सरकार सर्वसामान्यांना बुस्टर डोस घेण्याचे आवाहन करत आहे. त्याचबरोबर ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही अशा लोकांनाही जागरुक करण्यात येत असून त्यांनी लवकरात लवकर लस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- चिंताजनक! कोविड झालेल्या लहान मुलांना मधुमेह होण्याचा धोका अडीच पट अधिक : सीडीसी
- Covid 19 India Cases : गेल्या 24 तासात देशात 1 लाख 59 हजार 632 नवे कोरोनाबाधित
- Reliance : अमेरिकेनंतर अंबानींची न्यूयॉर्कमध्ये नवीन मालमत्ता, पंचतारांकित मँडरिन हॉटेलची खरेदी, किंमत ऐकून व्हाल थक्क
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha