World Anthropology Day : जगातील पहिला मानव कोण? त्याचे अवशेष कुठे सापडले?
World Anthropology Day : जगभरात 20 फेब्रुवारी रोजी मानववंशशास्त्र दिन साजरा केला जातो. मानववंशशास्त्राचे महत्त्व समजून घेणे हा हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे.

World Anthropology Day : मानववंशशास्त्र हे एक विज्ञान आहे जे मानवी विकास, संस्कृती, भाषा, समाज आणि वर्तन यांचा अभ्यास करते. त्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी, जागतिक मानववंशशास्त्र दिन दरवर्षी फेब्रुवारीच्या तिसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो. यावेळी 20 फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जाणार आहे. 2015 मध्ये अमेरिकन मानववंशशास्त्र संघटनेने याची सुरुवात केली होती. या निमित्ताने, विज्ञानानुसार जगातील पहिला मानव कोण होता, होमो हॅबिलिस-होमो सेपियन्स की आणखी कोणी हे जाणून घेऊया.
जगातील पहिला मानव कोण होता? (Who was first human in the world)
विज्ञानानुसार, जगातील पहिला मानव होमो हॅबिलिस (Homo Habilis) होता. त्यांचे अवशेष आफ्रिकेत सापडले आहेत आणि त्यांचे वय सुमारे 2.8 ते 1.4 दशलक्ष वर्षे जुने आहे. होमो हॅबिलिस हा जगातील पहिला मानव मानला जातो, कारण हा पहिला प्राणी होता जो दोन पायांवर चालण्यास सक्षम होता.
होमो सेपियन्स कोण होते? (Homo Sapiens)
होमो सेपियन्स हा आधुनिक मानवाचा पूर्वज मानला जातो. आज अस्तित्वात असलेल्या आपल्या सर्वांना होमो सेपियन मानले जाते. त्याच्या बुद्धिमत्तेचा सर्वाधिक विकास झाला. होमो सेपियन्सचे अवशेषही आफ्रिकेत सापडले आहेत आणि त्यांचे वय सुमारे 3,00,000 वर्षे आहे. होमो सेपियन्स हा आपला पूर्वज मानला जातो, कारण तो आपल्या सर्वांसारखा दिसणारा पहिला प्राणी होता. जेव्हा लोक एकमेकांना भेटतात आणि बोलतात तेव्हा आपले विचार हस्तांतरित होतात. होमो सेपियन्सचा विकास अशाच प्रकारे झाला आहे.
होमो सेपियन्स हे पाच वेगवेगळ्या प्रजातींमधून पार पडले आणि या सर्वांच्या वैशिष्ठ्यांची सांगड घातल्यानंतर एक बुद्धिमान माणूस विकसित झाला. जोपर्यंत मनुष्य एकमेकांना भेटतील, विचारांची देवाणघेवाण होईल तोपर्यंत त्याचा विकास होत राहणार. डार्विनचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देखील असे आहे की मानवी इतिहास हा क्रमिक विकास आणि बदलांचा आहे.
होमो निअँडरथॅलेन्सिस कोण होते? (Homo Neanderthalensis)
होमो निअँडरथॅलेन्सिसला देखील मानवाचे पूर्वज मानले जाते, कारण ते होमो सेपियन्ससह अस्तित्वात होते. त्यांचे पुरावे युरोप आणि आशियामध्ये सापडले आहेत. त्यांचे वय सुमारे 4,00,000 ते 40,000 वर्षे आहे.
Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ गृहीतकांवर आधारित आहे. ABP Majha अशा कोणत्याही माहितीचे समर्थन किंवा पुष्टी करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
