एक्स्प्लोर

Devendra Fadnavis on jaykumar Gore : जयकुमार गोरेंना 22 वर्षांची मुलगी, तिला काय वाटत असेल? फडणवीसांच्या प्रश्नाने सभागृहातील सगळेच निरुत्तर

Devendra Fadnavis on jaykumar Gore : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जयकुमार गोरे यांच्या प्रकरणावर सविस्तर भाष्य केलंय.

Devendra Fadnavis on jaykumar Gore : विधानसभेच्या अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिले. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांना अडकण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांचा हात असल्याचा गौप्यस्फोट केला. जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि आमदार रोहित पवारांचे (Rohit Pawar) कॉल रेकॉर्ड्स सापडल्याचा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी केला. तर जयकुमार गोरेंना 22 वर्षांची मुलगी आहे. तिला काय वाटत असेल? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करताच सभागृहातील उपस्थित सर्व नेते निरुत्तर असल्याचे दिसून आले. 

जयकुमार गोरेंना 22 वर्षांची मुलगी, तिला काय वाटत असेल? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे यांच्या प्रकरणावर सविस्तर भाष्य केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जयकुमार गोरे यांच्यासंदर्भात घडलेली जी घटना आहे, आपण राजकारण करतो, पण कोणाला जीवनातून उठवायचं अशा हेतूने राजकारण योग्य करणे योग्य नाही. ती केस 2016 मध्ये रजिस्टर झाली, 2019 साली ती केस संपली. ते तेव्हा भाजपमध्ये नव्हते. पण काही गोष्टी उकरुन काढल्या जात आहेत. मी त्यांच्या हिंमतीची दाद देतो, एखादा व्यक्ती अशा परिस्थितीत दोषी आहोत की नाही आहोत, घरच्यांना समाजात अपमान नको म्हणून अशा गोष्टी मिटवण्याचा प्रयत्न त्यांनी  केला. पण त्यांनी लाचेची मागणी झाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर ट्रॅप लावला, सगळं संभाषण टेप झाले, सगळी मागणी टेप झाली. मागणी टेप झाल्यानंतर पोलीस विभागाची खात्री पटली. त्यानंतर सापळा रचून पैसे देताना आरोपीला पकडण्यात आला. हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता, अशा प्रकारचे ब्लॅकमेलिंग नेत्यांच्या विरुद्ध कोणी करेल आणि आपणही त्याला हवा देण्याचा प्रयत्न करू. शेवटी त्यांच्याही घरी 22 वर्षांची मुलगी आहे. त्या मुलीवर काय परिणाम होत असेल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि सभागृहातील उपस्थित सर्व नेते निरुत्तर असल्याचे पाहायला मिळाले.  

फडणवीसांचा सुप्रिया सुळे, रोहित पवारांवर आरोप 

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जयकुमार गोरे यांच्या प्रकरणातील लोकांना अटक झाली आहे. यात जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणारी महिला, तुषार खरात आणि अनिल सुभेदार यांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. या सगळ्यांनी मिळून हा कट रचला आहे. याबाबत सगळे पुरावे सापडले आहेत. त्यांचे व्हाट्सअप वरचे संभाषण देखील सापडले आहे. त्यांचे दीडशे फोन झालेले आहेत. या सगळ्यांशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक संपर्कात असल्याचे दिसून आल्याचा आरोप त्यांनी केला. प्रभाकरराव देशमुख हे थेट तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत. तर सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवारांचे कॉल रेकॉर्ड्स सापडले आहेत. जयकुमार गोरे यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी सुळे आणि पवार यांना पाठवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. 

मी माझा फोन तपासासाठी द्यायला तयार : सुप्रिया सुळे

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर सुप्रिया सुळे आज संध्याकाळी उत्तर देणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मला नेता बनवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.  त्यांनी माझं नाव घेतलं, मी माझा फोन तपासासाठी द्यायला तयार आहे. संसदेच्या सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर आज संध्याकाळी दिल्लीत मी प्रतिक्रिया देईन, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना दिली आहे. आता सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी वाचा 

Jaykumar Gore : जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
Jivant Satbara Campaign: राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Asim Sarode On Prashant Koratkar Hearing Kolhapur : प्रशांत कोरटकरने आलिशान गाड्या कुठून आणल्या याचा शोध घ्यावाABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 25 March 2025 दुपारी 02 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar Hearing Kolhapur : कोर्टात कोरटकरला घाम फुटला; सरकारी वकिलांकडून पोलीस कोठडीची मागणीABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01PM 25 March 2025 दुपारी 01 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याचे मागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
Jivant Satbara Campaign: राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
Nashik FDA Raid : नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
Aurangzeb & Sambhaji Maharaj: औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारण्याचा आदेश दिल्यावर पंडितांनी मनुस्मृतीची पद्धत वापरायला सांगितली; काँग्रेसच्या हुसेन दलवाईंचं वक्तव्य
औरंगजेबाने संभाजी महाराजांना मनस्मृतीप्रमाणे मारलं, पंडितांनी पद्धत सांगितली: हुसेन दलवाई
Ambadas Danve : अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
Embed widget