एक्स्प्लोर

Yavatmal Crime News : बसचालकाने विद्यार्थीनीला नागपूरला नेलं अन्....; यवतमाळच्या उमरखेडमधली संतापजनक घटना, आरोपीला अटक 

Yavatmal Crime News : यवतमाळच्या उमरखेड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर बसचालकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.

Yavatmal Crime News : यवतमाळच्या उमरखेड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर बसचालकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.  या मधील पीडित विद्यार्थीनीला नागपूर येथे नेऊन हा अत्याचार केला असल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी बसचालकाला उमरखेड पोलिसांनी अटक केली आहे. संदीप विठ्ठल कदम (40, उमरखेड) असे बसचालकाचे नाव आहे. हे प्रकरण उजेडात येताच सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे. मात्र पुन्हा एकदा राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.

बसचालकाने विद्यार्थीनीला नागपूर नेलं अन्....    

पोलीस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, संदीप विठ्ठल कदम (40, उमरखेड) हा  बसचालक असून तो नागपूर बस डेपोमध्ये कार्यरत आहे. बसचालक हा पीडितेला नेहमीच भेटत असे. अशातच 23 मार्च रोजी पहाटे पाचच्या सुमारास नागपूर येथे पोहोचल्यानंतर तो पीडितेला एका रूमवर घेऊन गेला आणि त्याठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दुपारी चार वाजता नागपूर ते सोलापूर बसने पीडितेला उमरखेड येथे घेऊन निघाला. या दरम्यान विद्यार्थिनीने घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर उमरखेड येथे आल्यावर पीडितेने घडलेल्या प्रकरणाची सविस्तर माहिती देत आईसह पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी चालकावर गुन्हे नोंद करून अटक केली. सध्या या घटनेचा पुढील तपास  पोलीस करत आहे. 

गरोदर महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू, दोन डॉक्टरवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये गरोदर महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्या प्रकरणी दोन डॉक्टरवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. संगीता पाटीलसह डॉ मीनाक्षी केंद्रे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुढे आलेल्या माहितीनुसार, 13 फेब्रुवारी सुवर्णा सरोदे यांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता. यात मयत सुवर्णा हिच्या प्रसूती दरम्यान डॉ. संगीता पाटील, डॉ. मीनाक्षी केंद्रे या डॉक्टरांनी प्रसूती दरम्यान उपचार करताना हलगर्जीपाणा केल्यामुळे मृत्यू झाल्याचा यांच्यावर  ठपका ठेवण्यात आला. या घटनेबाबत डॉक्टरांची समिती गठीत करण्यात आली होती. कल्याण डोंबिवली मनपा जेजे रुग्णालय यांची या घटनेवर संयुक्त कमिटी गठीत करण्यात आली होती. या कमिटीने डॉ. संगीता पाटील, मीनाक्षी केंद्रे यांना जबाबदार धरत डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.  

इतर महत्वाच्या बातम्या 

Satara Bear attack: मोबाईलवर 5G नेटवर्क शोधत आजोबा जंगलात शिरले, कोअर झोनमध्ये पाय ठेवताच अस्वलाचा हल्ला, डोक्याला गंभीर दुखापत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : LPG गॅसला पर्याय सापडला, पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा, 20 वर्षांच्या संशोधनाला यश!
LPG गॅसला पर्याय सापडला, पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा, 20 वर्षांच्या संशोधनाला यश!
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Shubman Gill News : टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप जिंकला, पण सेलिब्रेशनमध्ये फोटोवरून वाद पेटला, कर्णधार शुभमन गिलवर आरोप, नेमकं काय घडलं?
टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप जिंकला, पण सेलिब्रेशनमध्ये फोटोवरून वाद पेटला, कर्णधार शुभमन गिलवर आरोप, नेमकं काय घडलं?
फोन वापरताना प्रसिद्ध TV अभिनेत्री खड्ड्यात पडली, चिखलानं माखली; व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
फोन वापरताना प्रसिद्ध TV अभिनेत्री खड्ड्यात पडली, चिखलानं माखली; व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Embed widget