Viral Video : 'नरकाच्या' दारात पोहोचला तरुण! धगधगत्या उकळणाऱ्या लाव्हाचा महासागर, काय घडले?
Viral Video : अवघ्या 21 सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत 2 मिलियन वेळा पाहिला गेला आहे.
![Viral Video : 'नरकाच्या' दारात पोहोचला तरुण! धगधगत्या उकळणाऱ्या लाव्हाचा महासागर, काय घडले? viral video marathi news place looks like lava ocean people shocked on social media Viral Video : 'नरकाच्या' दारात पोहोचला तरुण! धगधगत्या उकळणाऱ्या लाव्हाचा महासागर, काय घडले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/26/7bd0892bb8e044a84db15391fa742be11672040099406381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Viral Video : निसर्ग (Nature) जितका सुंदर दिसतो, तितकंच त्याचं उग्र रुपही पाहायला मिळतं. असाच एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. ज्यामध्ये ज्वालामुखीतून धगधगता उकळणारा लाव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागाला फाडून जेव्हा बाहेर येतो. तेव्हा तो जणू एका नरकाप्रमाणे (Hell) भासतो. या ज्वालामुखीमध्ये एका क्षणात सर्वात मोठे शहर देखील नष्ट करण्याची शक्ती आहे.
उकळत्या लाव्हाजवळ जाण्याची हिंमत कोण करेल?
ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यावर त्याच्या आजूबाजूच्या भागात विध्वंस निर्माण होतो. लोकांना एका रात्रीतून गाव किंवा शहर रिकामे करावे लागते. हे तुम्ही ऐकले असेल किंवा पाहिले असेल. ज्वालामुखीचा उकळणारा लावा इतका गरम असतो की तो क्षणात माणसाची हाडेही वितळवतो. अशा परिस्थितीत अशा उकळत्या लाव्हाजवळ जाण्याची हिंमत कोण करेल? परंतु आजकाल याच्याशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
What it looks like at the edge of a lava ocean pic.twitter.com/XeMhIrLolx
— OddIy Terrifying (@OTerrifying) December 24, 2022
माणूस 'नरकाच्या' द्वारापाशी कसा गेला?
या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने धगधगत्या ज्वालामुखीच्या लाव्हाजवळ जाऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे आणि तेही कोणत्याही सुरक्षिततेशिवाय... आता तुम्हीच विचार करा की, ज्वालामुखीच्या उकळत्या लाव्हाचे तापमान 1000 डिग्री सेल्सिअस असते, अशा स्थितीत तो माणूस त्याच्या जवळ कसा गेला? त्याला उकळत्या लाव्हाची उष्णता जाणवली नसेल का? हे भितीदायक दृश्य खरे आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसे हे दृश्य पाहून या ठिकाणाला 'नरकाचे द्वार' म्हटले तर वावगे ठरणार नाही. असे दिसते की, हे ठिकाण ज्वालामुखीच्या उकळत्या लाव्हाची नदी किंवा समुद्र आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांचा थरकाप उडाला आहे, मग अशा ठिकाणी जायची हिंमत कोण करेल?
अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल
हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @OTerrifying नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हे ठिकाण लाव्हाचे महासागर आहे. अवघ्या 21 सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत 2 मिलियन म्हणजेच 20 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 51 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केले आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, 'मला लाव्हा समुद्राच्या इतक्या जवळ उभे राहायला कधीच आवडणार नाही', तर दुसऱ्या यूजरने गंमतीने लिहिले आहे की, या उकळत्या लाव्हाजवळ गेलेला व्यक्ती एक आत्मा असेल, असे लिहिले आहे.
इतर बातम्या
Viral Video : ...आणि बघता बघता हरणांचा कळप विमानाला घेऊन चक्क आकाशात उडाला! व्हिडिओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)