Nagpur Tiger Death : खळबळजनक! H5N1 मुळे नागपूरच्या गोरेवाड्यातील तीन वाघ अन् बिबट्याचा मृत्यू; राज्यातली पहिलीच घटना
Nagpur News: गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हा मृत्यू H5N1 (बर्ड फ्ल्यु)ने झाल्याचा खळबळजनक अहवाल भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेतून प्राप्त झालाय.
Nagpur News : नागपूरच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील रेस्क्यू सेंटरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हा मृत्यू H5N1 (बर्ड फ्ल्यु) ने झाल्याचा खळबळजनक अहवाल भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेतून प्राप्त झालाय. H5N1 हा पक्षांमध्ये आढळणार विषाणू आहे. मात्र वाघ व बिबट्यांना यांची लागण झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडली आहे. H5N1 मुळे वाघांचा मृत्यू होण्याची ही राज्यातली पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
राज्यभरातील सर्व प्राणी संग्रहालय, अभयारण्ये आणि उपचार केंद्रांना रेड अलर्ट
सध्या गोरेवाड रेस्क्यु सेंटर ला 12 वाघ व 24 बिबट्यांना ठेवण्यात आले आहे. त्यांना H5N1 लागण झाली नाही. मात्र संपूर्ण रेस्क्यू सेंटरचे रोज निर्जंतुकीकरण केले जात असून प्राण्यांमध्ये सोशल डीस्टंटसिंग पळाली जात असल्याची माहिती गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय अधिकारी सातनीक भागवत यांनी दिली आहे. दुसरीकडे हा प्रकार लक्षात घेता राज्यातील सर्व प्राणी संग्रहालय, अभयारण्ये आणि उपचार केंद्रांना रेड अलर्ट देण्यात आले आहेत.
कोळसा खाणीत वाघाचा वावर, कामगारांमध्ये भीतीचे वातावरण
चंद्रपूर शहरालगतच्या नांदगाव खुल्या कोळसा खाणीत वाघाचा वावर असल्याचे बोलले जात होते. दरम्यान या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा भला मोठा वाघ कैद झाला आहे. बूम बॅरिअरजवळ तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाला हा वाघ दिसला आहे. नांदगाव खाणीच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही हा वाघ झाला कैद असून कोळसा खाण क्षेत्रात वाघ असल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघिणीला जेरबंद करण्याचा निर्णय घेतलाय.
परिणामी, खाण परिसरात वाघ दिसल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी कामगारांनी केली आहे. खाणीतून मातीचे अजस्त्र ढीग निघत असून आता हे ढीग डोंगर बनले आहेत. या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात जंगलासारखी झुडपे असल्याने या भागात वन्यप्राण्यांचा वावर आहे.
इतर महत्वाच्या बातम्या