एक्स्प्लोर

5 New Tiger Cubs: वाघिणीला पाच बछड्यांसह घेरणं पडलं महागात, जिप्सी चालक, गाईडवर निलंबनाची कारवाई, नेमकं काय घडलं?

Sighting of tigress with 5 cubs in Tadoba: सध्या उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव जवळ सध्या एक वाघीण आणि तिचे पाच बछडे पर्यटकांना भुरळ घालत आहेत.

नागपूर : उमरेड-पवनी-कऱ्हांडला (Umred Karhandla Wildlife Sanctuary) अभयारण्यातील गोठणगाव गेट जवळ एक वाघीण आणि तिचे पाच बछडे पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरले आहेत. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील प्रसिद्ध एफ-2 वाघिणीला तिच्या 5 बछड्यांसह रस्तावर फिरत असताना तिचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी जंगल सफारीवर असलेल्या पर्यटकांच्या जिप्सीनं समोरून व मागून घेरलं होत. याचा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात जिप्सीचे 4 चालक व 4 गाईड यांना 7 दिवसांसाठी निलंबित केलं आहे. 

तर जिप्सी चालकांवर अडीच हजार व गाईडला 450 रुपये प्रति व्यक्ती दंड लावण्यात आला आहे. मंगळवारी या जिप्सी चालकांनी व गाईडनी गोठणगाव तलावाजवळ वाघीण व तिच्या 5 बछड्यांसह जात असताना रस्त्यावर बराच वेळ घेरून ठेवलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यामुळं पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक व उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याचे प्रभारी डॉ. प्रभूनाथ शुक्ला यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी आरती उईके यांना चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अभयारण्य प्रशासनानं ही कारवाई केली आहे.

असा आहे नियम?

वाघापासून वाहनं 30 मीटर दूर असणं गरजेचं असतं, वन्यजीव तज्ज्ञांच्या मते पेंच, ताडोबा व अन्य व्याघ्र प्रकल्पासह अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची गती, वाहनं कुठं थांबतात, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक ॲप बनविण्यात आला आहे. जर नियमांचं उल्लंघन होत असेल तर गुन्हा नोंदविला जातो. जंगलांमध्ये वाघाजवळून कुठलेही वाहन 30 मीटर दूर असलं पाहिजे. वाघाच्या मागेपुढे वाहने उभी करणे हे चुकीचं आहे.

सध्या उमरेड-पवनी-कऱ्हांडला (Umred Karhandla Wildlife Sanctuary) अभयारण्यातील गोठणगाव जवळ सध्या एक वाघीण आणि तिचे पाच बछडे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. F- 2 (एफ-2) नावाच्या या वाघिणीसह तिच्या पाच बछड्यांचं उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांना दर्शन होत असल्यानं पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. F-2 वाघीण ही फेरी वाघिणीची मुलगी आहे. N-4 आणि पाटील नावाच्या दोन वाघासोबत तिचा वावर होता. नववर्षानिमित्त नागपूरच नाही तर विदर्भातील वनप्रेमी पर्यटक नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडलाच्या जंगलाला भेट देत आहेत. या जंगलात वाघोबाचं हमखास दर्शन पर्यटकांना होताना दिसत आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या देखील वाढू लागली आहे. ही वाघीण आपल्या पाच बछड्यांसह गोठणगाव गेट परिसरात फिरताना दिसली होती.

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Las Vegas Tesla Truck Blast Case : नाताळच्या दुसऱ्या दिवशी भांडण अन् सहा दिवसांपूर्वी बायकोशी घटस्फोट! अमेरिकन जवानाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हाॅटेलसमोर ब्लास्ट केला!
नाताळच्या दुसऱ्या दिवशी भांडण अन् सहा दिवसांपूर्वी बायकोशी घटस्फोट! अमेरिकन जवानाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हाॅटेलसमोर ब्लास्ट केला!
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा; जरांगे, धस, सोनवणेंसह 'हे' बडे नेते सहभागी होणार
संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा; जरांगे, धस, सोनवणेंसह 'हे' बडे नेते सहभागी होणार
परभणीत शेकोट्या पेटल्या, कडाक्याच्या थंडीनं अंगावर शहारा, किमान तापमानाचा पारा आज किती होता?
परभणीत शेकोट्या पेटल्या, कडाक्याच्या थंडीनं अंगावर शहारा, किमान तापमानाचा पारा आज किती होता?
Rohit Sharma : सिडनी कसोटीत कॅप्टन असूनही स्वत:च संघाबाहेर, रोहित शर्मानं अखेर मौन सोडलं, फक्त पाच शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
सिडनी कसोटीत कॅप्टन असूनही स्वत:च संघाबाहेर, रोहित शर्मानं अखेर मौन सोडलं, फक्त पाच शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed : संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या; परभणीत सर्वपक्षीय, सर्वधर्मीय मूकमोर्चाNCP Meeting : पालकमंत्रीपदाचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक, अजित पवारांच्या उपस्थितीत बैठकMajha gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 04 Jan 2025 | ABP MajhaABP Majha Headlines |  7 AM |  एबीपी माझा हेडलाईन्स | 04 Jan 2025 | Marathi News 24*7

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Las Vegas Tesla Truck Blast Case : नाताळच्या दुसऱ्या दिवशी भांडण अन् सहा दिवसांपूर्वी बायकोशी घटस्फोट! अमेरिकन जवानाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हाॅटेलसमोर ब्लास्ट केला!
नाताळच्या दुसऱ्या दिवशी भांडण अन् सहा दिवसांपूर्वी बायकोशी घटस्फोट! अमेरिकन जवानाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हाॅटेलसमोर ब्लास्ट केला!
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा; जरांगे, धस, सोनवणेंसह 'हे' बडे नेते सहभागी होणार
संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा; जरांगे, धस, सोनवणेंसह 'हे' बडे नेते सहभागी होणार
परभणीत शेकोट्या पेटल्या, कडाक्याच्या थंडीनं अंगावर शहारा, किमान तापमानाचा पारा आज किती होता?
परभणीत शेकोट्या पेटल्या, कडाक्याच्या थंडीनं अंगावर शहारा, किमान तापमानाचा पारा आज किती होता?
Rohit Sharma : सिडनी कसोटीत कॅप्टन असूनही स्वत:च संघाबाहेर, रोहित शर्मानं अखेर मौन सोडलं, फक्त पाच शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
सिडनी कसोटीत कॅप्टन असूनही स्वत:च संघाबाहेर, रोहित शर्मानं अखेर मौन सोडलं, फक्त पाच शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
EPFO : ईपीएफओ सदस्यांसाठी गुड न्यूज, देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार, 68 लाख पेन्शनर्सला फायदा
EPFO सदस्यांसाठी मोठी अपडेट, पेन्शनची रक्कम कोणत्याही बँकेतून काढता येणार, नवी प्रणाली लागू
Rohit Sharma :हिटमॅनचं टेस्ट करिअर संकटात, रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर,रिषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
रोहित शर्मा पाचव्या कसोटीतून बाहेर, भारतीय संघातून पहिली प्रतिक्रिया, रिषभ पंत म्हणाला...
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
Fact Check : काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Embed widget