(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Meta : मेटा फेसबुककडून पेटंट चोरल्याचा आरोपाचं खंडन, कंपनीला 1405 कोटींचा दंड, काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर
Meta : मेटा कंपनीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मेटा फेसबुकवर पेटंट चोरल्याच्या आरोप करत कंपनीला सुमारे 1405 कोटींचा दंड सुनावण्यात आला आहे.
Meta Patent Infringement Case : मेटा (Meta) कंपनीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मेटावर पेटंट चोरल्याच्या आरोप (Patent Infringement Case) करत कंपनीला सुमारे 1405 कोटींचा दंड सुनावण्यात आला आहे. मात्र, मेटा कंपनीने पेटंट चोरल्याच्या आरोप फेटाळले आहेत. सॅन फ्रान्सिस्कोमधील वॉक्सर (Voxer) या कंपनीचे पेटंट चोरल्याचा आरोप मेटा कंपनीवर करण्यात आला आहे. यामध्ये आता अमेरिकन न्यायालयाने मेटा कंपनीला पेटंटचे उल्लंघन केल्याप्रकरणी 175 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 1405 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मेटा कंपनीनं या आरोपांचं खंडन करत या आदेशाला आव्हान देणार असल्याचं म्हटलं आहे.
मेटा कंपनीला 1405 कोटीचा दंड
वॉक्सर कंपनीने मेटा कंपनी विरोधात टेक्सासमधील न्यायालयात याचिका दाखल केली. या संदर्भातील खटला पार पडला. मेटा कंपनीच्या विरोधात या खटल्याची सुनावणी झाली. फेडरल न्यायाधीशाने मेटा कंपनीला वॉक्सरला नुकसान भरपाई म्हणून 1405 कोटी देण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
सॅन फ्रान्सिस्को येथील कंपनी वॉक्सर (Voxer) याचं पेटंट चोरल्याचा आरोप मेटा कंपनीवर आहे. या आरोपामध्ये म्हटलं आहे की, वॉक्सर कंपनीकडून पेटंट करण्यात आलेलं तंत्रज्ञान मेटा कंपनीने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या लाईव्ह फिचरसाठी वापरल्याचा आरोप आहे. हे पेटंट कायद्याचं उल्लंघन असल्याचं वॉक्सर कंपनीनं म्हटलं.
मेटाकडून पेटंट आरोपांचं खंडन
मेटा कंपनीकडून याबाबत प्रतिक्रिया समोर आली आहे. मेटा कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे की, 'मेटाकडून पेटंट चोरी करण्यात आलेलं नाही. सुनावणी वेळी मेटाच्या विरोधात दाखवण्यात आलेल्या पुराव्यांवरून पेटंट चोरीचे आरोप सिद्ध होत नाही.' मेटा कंपनी या आदेशाला आव्हान देणार आहेत.
वॉक्सर कंपनीने काय म्हटलंय?
वॉक्सरचे संस्थापक, टॉम कॅटिस यांनी 2006 मध्ये अफगाणिस्तानमध्ये स्पेशल फोर्स कम्युनिकेशन सार्जंटची सेवा करताना आलेल्या युद्धक्षेत्रातील संप्रेषण समस्यांचं निराकरण करण्याचा मार्ग म्हणून हे तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरुवात केली. कॅटिस आणि वॉक्सर टीमने तंत्रज्ञान विकसित केले ज्यामुळे लाइव्ह व्हॉइस आणि व्हिडीओ वापरता येणं शक्य झालं. 2011 मध्ये त्यांनी वॉकी टॉकी अॅप लाँच केलं. या अॅपमधील पेटंट फिचर चोरल्याचा आरोप मेटा कंपनीवर आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या