एक्स्प्लोर

New Delhi : मेटाव्हर्ससाठी लागणारे कौशल्य निर्माण करण्यासाठी स्टार्टअप प्रोग्राम लॉन्च; आयटी मंत्रालयाचा उपक्रम

New Delhi : अॅक्‍सीलरेटर प्रोग्राम 40 सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यामधील स्‍टार्ट-अप्‍सना एक्‍सआर तंत्रज्ञानांवर आधारित उत्पादने आणि सोल्‍यूशन्‍स निर्माण करण्‍यास मदत करणार 

नवी दिल्ली : देशातील एक्सटेंडेड रिअॅलिटी टेक्नॉलॉजीला चालना देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचा (एमईआयटीवाय) एक उपक्रम एमईवायटीवाय स्‍टार्टअप हब (एमएसएच) आणि मेटाने एक्‍सआर स्टार्टअप प्रोग्राम लॉन्च केला आहे. हा उपक्रम देशातील  मेटाव्हर्ससाठी लागणारे कौशल्य आणि तांत्रिक क्षमता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणारा आहे. यामुळे ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) सह या नवीन टेक्नॉलॉजीला आकार देण्यास मदत होईल.   

या संदर्भात, अॅनालिसिस ग्रुपने नुकत्याच केलेल्‍या संशोधनानुसार मेटाव्हर्स 2031 पर्यंत भारताच्या जीडीपीमध्ये 240 बिलियन डॉलर्स म्‍हणजेच 4.6 टक्‍क्‍यांची भर करेल, असा अंदाज आहे. याचा थेट परिणाम रोजगाराच्या संधी, विशेष उद्योग, पायाभूत सुविधांवर होणार आहे.

या एक्‍सआर स्टार्टअप प्रोग्राममध्ये एक अॅक्‍सीलरेटर आणि एक ग्रॅण्‍ड चॅलेंज समाविष्ट असेल. याचा उद्देश देशातील उदयोन्मुख टेक इकोसिस्टमला चालना देणे आणि शिक्षण, अध्‍ययन आणि आरोग्यसेवा यांसारख्या विविध क्षेत्रांमधील कल्पनांना प्रोत्साहन देणे हा उद्देश असेल.     
या संदर्भात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) म्हणाले, “एक्‍सआरसारख्या इमर्सिव्ह तंत्रज्ञानामध्ये डिजिटल लँडस्केप बदलण्याची शक्ती आहे आणि यामुळे देशाला मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. मी मेटासोबतच्या सहयोगासाठी उत्‍सुक आहे आणि मला आशा आहे की, यामुळे ‘2025 पर्यंत भारताला ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याच्या’ सरकारच्या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने भावी तंत्रज्ञानातील गुंतवणूकीच्या वाढीला चालना देण्यासाठी आवश्यक गती मिळेल.’’ 

या सहयोगाबाबत आपले मत व्यक्त करत मेटाच्‍या ग्लोबल पॉलिसीचे उपाध्यक्ष जोएल कॅप्लान म्हणाले, “भारत भावी तंत्रज्ञान परिभाषित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. भारतात घेतलेले निर्णय आणि गुंतवणूक आता तंत्रज्ञान अधिक आर्थिक संधी आणि लोकांसाठी चांगले परिणाम कसे देऊ शकते यावर जागतिक चर्चेला आकार देतात. भारतातील टेक स्टार्टअप्स आणि नवप्रवर्तकांना मेटाव्हर्सचा पाया तयार करण्यास सक्षम करणारी इकोसिस्टम तयार करण्यास आम्ही मदत करणे महत्त्वाचे आहे.”

एमएसएच बाबत माहिती

तंत्रज्ञानातील नाविन्यता, स्टार्ट-अप आणि बौद्धिक संपत्तीच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्‍या उद्देशाने एमईआयटीवायच्या दृष्टीकोनात सुसूत्रता आणण्यासाठी त्‍यांच्‍या तत्त्वांतर्गत नोडल संस्‍था ‘एमईआयअीवाय स्‍टार्ट-अप हब (एमएसएच)’ची स्‍थापना करण्‍यात आली आहे. ही संस्‍था राष्ट्रीय समन्वय, सुविधा आणि देखरेख केंद्र म्हणून काम करेल. ज्‍यामध्‍ये सर्व इनक्‍युबेशन सेंटर्स, स्‍टार्ट-अप्‍स संबंधित कृतींचा समावेश असेल. 2021 पर्यंत एमएसएचमध्‍ये 2,650 हून अधिक स्टार्टअप्स, 418 इनक्यूबेटर, 347 मार्गदर्शक आणि 22 अत्याधुनिक सेंटर्स ऑफ एक्सलन्स (सीओई) यांचा समावेश आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil on Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर
Video : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर!
Sharad Ponkshe : कोणत्या मतदारसंघातून लोकसभा लढवायला आवडेल? शरद पोंक्षेंचं रोखठोक वक्तव्य!
कोणत्या मतदारसंघातून लोकसभा लढवायला आवडेल? शरद पोंक्षेंचं रोखठोक वक्तव्य!
IPL 2024: हरणाऱ्या मॅचेस जिंकल्या, गोलंदाजांना धू धू धुतलं, IPL च्या पहिल्या आठवड्यात सापडलेले तीन हिरे!
हरणाऱ्या मॅचेस जिंकल्या, गोलंदाजांना धू धू धुतलं, IPL च्या पहिल्या आठवड्यात सापडलेले तीन हिरे!
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  06 PM : 29 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVasant More : मी असेपर्यंत पुण्याची निवडणूक एकेरी होणार नाही : वसंत मोरे ABP MajhaBachchu Kadu : ... तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू, बच्चू कडूंचा महायुतीवर 'प्रहार' ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 29  मार्च 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर
Video : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर!
Sharad Ponkshe : कोणत्या मतदारसंघातून लोकसभा लढवायला आवडेल? शरद पोंक्षेंचं रोखठोक वक्तव्य!
कोणत्या मतदारसंघातून लोकसभा लढवायला आवडेल? शरद पोंक्षेंचं रोखठोक वक्तव्य!
IPL 2024: हरणाऱ्या मॅचेस जिंकल्या, गोलंदाजांना धू धू धुतलं, IPL च्या पहिल्या आठवड्यात सापडलेले तीन हिरे!
हरणाऱ्या मॅचेस जिंकल्या, गोलंदाजांना धू धू धुतलं, IPL च्या पहिल्या आठवड्यात सापडलेले तीन हिरे!
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
Amravati Loksabha Election : ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
Mrunal Dusanis : मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
Sharad Pawar Collar Video :उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
Embed widget