Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
LIVE
Background
पुण्यात सीरम इंस्टीट्यूटच्यामागे एका व्यक्तीवर हल्ला करणाऱ्या बिबटयाला पकडण्यात अखेर यश
मंगळवारी सकाळी पुण्यातील हडपसर मधील सीरम इन्स्टिट्यूटच्या कंपाऊंड वॉलजवळ एका व्यक्तीवर हल्ला करणाऱ्या बिबटयाला पकडण्यात अखेर यश आलंय. सीरम इन्स्टिट्यूटच्या पाठीमागच्या बाजूस मॉर्निंग वॉक साठी गालेल्या संभाजी आटोळे नावच्या व्यक्तीवर हल्ला करून हा बिबट्या हडपसर मधील आणखी दाट लोकवस्तीत शिरला होता. त्यामुळे त्याला पकडण्याचे आवाहन वन विभागासमोर होते. दिवसभर या बिबट्याचा शोध घेतल्यावर तो दोन भिंतींच्या मधे असलेल्या जागेत लपून बसला होता. वन विभागाच्या अधिकारार्यांनी अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर जिळीच्या सहाय्याने या बिबट्याला पकडण्यात यश मिळवलंय. हा बिबट्या पुर्ण वाढ झालेला असल्याच वन विभागाच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आलय.
किरण गोसावी पुन्हा पसार... उत्तर प्रदेशमध्येही दिला पुणे पोलिसांना गुंगारा
मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drug Case) प्रकरणात वादग्रस्त असलेल्या किरण गोसावीने (Kiran Gosavi) पुणे पोलिसांना उत्तर प्रदेशमध्येही गुंगारा दिला असल्याचं स्पष्ट झालंय. पुणे पोलिसांच्या दोन पथकांकडून सध्या किरण गोसावीचा उत्तर प्रदेशमध्ये तपास सुरु आहे. गोसावीचं शेवटचं लोकेशन यूपीतल्या फत्तेपूरमध्ये असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. किरण गोसावी सध्या उत्तर प्रदेशमध्ये असून तो सातत्याने त्याचं लोकेशन बदलतोय. आज दुपारी साडे बाराच्या दरम्यान त्याचं शेवटचं लोकेशन हे फत्तेपूर असल्याची माहिती आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात किरण गोसावीने आर्यन खानला सोडवायच्या बदल्यात शाहरूख खानकडून 25 कोटी रुपये मागितल्याचा आरोप त्याचा बॉडिगार्ड प्रभाकर साईल याने केला आहे. तसेच किरण गोसावीवर पुण्यामध्ये गुन्हे नोंद असून त्या प्रकरणी पुणे पोलीस त्याच्या शोधात आहेत. पुणे पोलिसांच्या दोन टीम लखनौला गेल्या आहेत.
दिवाळीनिमित्त आठवडाभर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सुटी
दिवाळी व रविवारच्या सुट्ट्यांमुळे सलग आठवडाभर ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कामकाज बंद राहणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. ३१ ऑक्टोबर रविवारची सुटी, १ नोव्हेंबर रोजी २६ सप्टेंबर रोजी झालेल्या अधिसभेची पर्यायी सुटी, २ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, ३ नोव्हेंबर रोजी १० जानेवारी रोजी झालेल्या अधिसभेची पर्यायी सुटी, ४ व ५ नोव्हेंबर लक्ष्मीपूजन व बलिप्रतिपदेची सुटी, ६ नोव्हेंबर रोजी पहिल्या शनिवारची सुटी तर रविवार ७ नोव्हेंबर रोजीही सुटी आहे. विद्यापीठाचे कामकाज ८ नोव्हेंबरपासून सुरळीत सुरु असेल असेही विद्यापीठ प्रशासनाने कळवले आहे.
पुण्यात गेल्या 24 तासात 96 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 104 रुग्णांनी केली कोरोनावर मात
पुण्यात गेल्या 24 तासात 96 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 104 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 494111 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सध्या पुण्यात 832 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 5490 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये 'द बर्निंग बस' चा थरार; अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश
पिंपरी चिंचवडमध्ये द बर्निंग बसचा थरार पहायला मिळाला. दापोडीतील मुळा नदीच्या पुलावर पीएमपीएमएल बसला अचानक आग लागली. पुण्याहून दापोडीला ही बस येत होती. त्यात वीस ते पंचवीस प्रवासी होते, मात्र प्रसंगावधान दाखवत चालकाने सर्व प्रवासी खाली उतरवले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आधी इंजिन मधून धूर आला अन नंतर पेट घेतला. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. ही बस सीएनजीवर चालणारी असल्याने गॅसच्या टाकीपर्यंत आग पोहचू न देण्याचं आव्हान जवनांसमोर होतं. त्यात त्यांना यश मिळालं आणि आग आटोक्यात आली.