Pune Accident: मोठी बातमी : पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीचा प्रताप, पिकअप चालवताना दुचाकीला उडवलं, तरुणाचा मृत्यू!
Pune News: शिरुर परिसरात एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस पाटलाच्या 15 वर्षांच्या मुलीने पिकअप गाडीने एका बाईकस्वाराला उडवले. यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे: पुण्याच्या कल्याणीनगर परिसरातील हिट अँड रन प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असताना शिरुर तालुक्यातही एका पोलीस पाटलाच्या अल्पवयीन (वय 15) मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या भीषण अपघातामध्ये (Pune Accident) दुचाकीवरील 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा गंभीर होता की मालवाहू पिकअपने मोटार सायकलसह चालकास 20 ते 30 फुट फरफटत नेले. या अपघातात दुचाकी चालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला तर महिंद्र बांडे हा गंभीररित्या जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, लेंढे कुटुंबीय मालवाहतूक टेम्पो घेऊन जात होते. यावेळी गाडीमध्ये आई-वडील, मुलगा आणि मुलगी होते. मुलगी गाडी चालवत होती. पिकअप क्रं एम एच 12 एस एफ 3439 अरणगावातील पोलिस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी चालवत होती. तिच्यासोबत शेजारील सिटवर पोलिस पाटील संतोष निवृत्ती लेंडे बसले होते. सदर मुलीने तिच्या ताब्यातील सदरचा पिकअप हा जोरात भरधाव वेगात चालवून दुचाकीला समोरुन धडक देऊन सदरचा अपघात केला. या प्रकरणी शिक्रापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईला गुन्हे शाखेकडून अटक; आज न्यायालयासमोर करणार हजर