एक्स्प्लोर

Pune Porsche Car Accident: पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईला गुन्हे शाखेकडून अटक; आज न्यायालयासमोर करणार हजर

Pune Car Accident: रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप देखील शिवानी अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

पुणे : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल (Shivani Agarwal Arrest) यांना पुणे क्राइम ब्रांचने अटक केली आहे. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. याच आरोपाखाली शिवानी अग्रवाल यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप देखील शिवानी अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवानी अग्रवाल या घरी नव्हत्या. पोलिसांनी त्यांना शोधून काढलं आहे आणि आज न्यायालयासमोर शिवानी अग्रवाल यांना हजर करण्यात येईल. 

आज अल्पवयीन मुलाचीही चौकशी करणार

पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच आज अल्पवयीन मुलाचीची चौकशी करणार आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्त आणि दोन महिला पोलिसांकडून अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलाने दोघांना भरधाव पोर्शे कारने चिरडलं होतं. अपघातानंतर अल्पवयीन मुलाची कोणतीही चौकशी झाली नव्हती किंवा कोणताही जबाब नोंदवण्यात आला नव्हता. पुणे पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळाला पत्र लिहून अल्पवयीन मुलाच्या चौकशीची परवानगी मिळण्यासाठी मागणी केली होती. त्यानंतर आता बाल हक्क न्याय मंडळाने पोलिसांना चौकशीसाठी परवानगी दिली आहे. या चौकशीदरम्यान अल्पवयीन मुलाला घटनेसंबंधित अनेक प्रश्न विचारले जातील. बाल हक्क न्याय मंडळाचा एक सदस्य चौकशीच्या वेळी उपस्थित असतील. न्यायालयाने अल्पवयीन मुलाच्या पालकांना उपस्थित राहण्यास सांगितल आहे. मात्र, अल्पवयीन मुलाचे वडील कोठडीत आहेत आणि आई अज्ञातवासात आहे. अल्पवयीन मुलाच्या भावाला देखील पत्र पाठवून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे. 

बाप-लेकास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने बेजबाबदारपणे गाडी चालवली, त्यात अपघात होऊन दोघांचा जीव गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर, पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल आणि त्याचे वडिल सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर ड्रायव्हरला धमकावल्याप्रकरणी, व अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आता न्यायालयाने दोन्ही बाप-लेकास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

विशाल अग्रवालवर विविध गुन्हे

पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवालवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम 201 अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला 'तू कार चालवत होता असं पोलिसांना खोटं सांग' असं विशाल अग्रवालने ड्रायव्हरला सांगितल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आणि आरटीओच्या तक्रारीचेही गुन्हे दाखल आहेत. आरटीओच्या तक्रारीनंतर कलम 420 च्या अंतर्गत दुसरा गुन्हा विशाल अग्रवालवर दाखल झाला आहे. पोर्शे कारची नोंदणी झालेली नसताना त्याची नोंद झाल्याची खोटी माहिती दिल्याबद्द्ल हा गुन्हा आहे. तर, ड्रायव्हरचे अपहरण व धमकी दिल्याचाही गुन्हा अग्रवाल पिता-पुत्रावर आहे.  

इतर महत्वाची बातमी-

अग्रवाल पिता-पुत्रास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा; पण, पोलिस पुन्हा ताबा घेणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Bypoll : माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडेंनी मुंबईचा नामवंत वकील पाठवला होता, करुणा शर्मांचा आरोप
Baramati Bypoll : माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडेंनी मुंबईचा नामवंत वकील पाठवला होता, करुणा शर्मांचा आरोप
Baramati Byelection: बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना बोगस आणि निकृष्ट खते, शेतकऱ्यांना मोठा फटका, औषध कंपन्यांनवर गुन्हा दाखल करण्याची राजू शेट्टींची मागणी
कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना बोगस आणि निकृष्ट खते, शेतकऱ्यांना मोठा फटका, औषध कंपन्यांनवर गुन्हा दाखल करण्याची राजू शेट्टींची मागणी
Harshwardhan Sapkal On Baramati By Election 2026: बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला!
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; सपकाळांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला!

व्हिडीओ

Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
सुनेत्रा पवारांसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत गोपीचंद पडळकर; भाजपकडून 40 नेत्यांची यादी आयोगाकडे सादर
सुनेत्रा पवारांसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत गोपीचंद पडळकर; भाजपकडून 40 नेत्यांची यादी आयोगाकडे सादर
युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार
युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार
Baramati Byelection: बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
Byelection: राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम
राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम
Satara ZP Election : राष्ट्रवादी ऐवजी भाजपच्या उमेदवाराला मतदान, पक्षाचा व्हिप मोडला, राष्ट्रवादी काँग्रेसकडून लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि कामेश कांबळेंविरोधात अपात्रतेची कारवाई सुरु
लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि कामेश कांबळे अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपात्रतेची कारवाई सुरु
Harshwardhan Sapkal On Baramati By Election 2026: बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला!
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; सपकाळांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला!
पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं, अश्विनी देशमुखांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरताच सल्ला
पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं, अश्विनी देशमुखांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरताच सल्ला
Embed widget