Pune Crime News : पुणे ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट! आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड, मुंबई कनेक्शन आलं समोर
Pune Crime News : पुणं शहर ड्रग्सच्या विळख्यात सापडलं आहे. त्यातच आता पुण्यातील ड्रग्स विक्रीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आलं आहे.

पुणे : पुणं (Pune) शहर ड्रग्सच्या (Pune drugs) विळख्यात सापडलं आहे. त्यातच आता पुण्यातील ड्रग्स विक्रीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आलं आहे. पुण्यात सापडलेले ड्रग्सची विक्री देशातील विविध भागात तसंच परदेशात होणार होती. पुण्यात काल (19 फेब्रुवारी) पकडण्यात आलं होतं. या ड्रग्सचं पुढे काय करणार होते, याची चौकशी करत असताना आंतरराष्ट्रीय आणि मुंबईचं ड्रग्स रॅकेट समोर आलं आहे.
मुंबई आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर
काल रात्री (19 फेब्रुवारी) पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई करत 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त केले आहे. पुणे (Pune) पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत 52 किलो पेक्षा आधिक मेफेड्रॉन (एमडी- Mephedrone) मिळून आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एका किलो एमडीची किंमत 2 कोटी रुपये आहे. हे पुण्यात पकडलेले एम डी ड्रग्स मुंबईला पाठवण्यात येणार होते. मुंबईतील पॉल आणि ब्राऊन या ड्रग्स पेडलरकडे विक्री या ड्रग्सची विक्री होणार होती. पॉल आणि ब्राऊन हे दोघे ही परदेशी नागरिक आहेत. 2 दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 3 जणांना अटक केली होती. वैभव माने, अजय कारोसिया, हैदर शेख असे या 3 आरोपींची नावे आहेत. यातील माने आणि हैदर यांच्याविरोधात अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
मिठाच्या पाकिटात लपवला ड्रग्ससाठा
वैभन माने आणि हैदर शेख हे मागील वर्षी येरवडा कारागृहातून बाहेर आले आहेत. तेव्हापासून या दोघांनी ड्रग्सची विक्री करण्यास सुरुवात केली. पुण्यात मोठ्या प्रमाणात ते ड्रग्स विक्री करायचे. साधा ड्रग्स साठा पोलिसांच्या हाती लागेल म्हणून हैदरने शक्कल लढवली आणि हैदरने ड्रग्ससाठा मिठाच्या पाकिटात पुण्यातील विश्रांतवाडी भागात लपावला होता.
रॅकेटचे धागेदोरे शोधणार
पुण्यात मागील काही दिवसांत ड्रग्स तस्करीचं प्रमाणत चांगलंच वाढलं आहे. ड्रग्स तस्करांना अटक करुन शिक्षा जरी केली तर त्यांचं रॅकेट मात्र सुरु आहे. पुणे पोलीस हे रॅकेट उद्ध्वस्त करुन शेवटच्या तस्करांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणातदेखील अनेक धागेदोरे पुढे येण्याची दाट शक्यता आहे. ड्रग्स मुंबई आणि परदेशी पाठवण्यात येणार असल्यानं हे आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट नेमकं कुठंपर्यंत पसरलं आहे?, याची पोलीस सखोल चौकशी करत आहे. एक एका आरोपीकडून सगळी माहिती घेतली जात आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
