(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO : मोठी बातमी : उद्धव ठाकरेंच्या कारवर मनसैनिकांचा हल्ला, गाडीवर शेण फेकले
Uddhav Thackeray ,Thane : ठाकरे गटाचे प्रमुख यांच्या गाडीवर मनसैनिकांकडून शेण फेकण्यात आलय. उद्धव ठाकरेंचा आज ठाण्यामध्ये 'भगवा सप्ताह मेळावा' पार पडणार आहे. त्यापूर्वी मनसैनिकांकडून उद्धव ठाकरेंच्या कारवर हल्ला करण्यात आलाय.
Uddhav Thackeray ,Thane : ठाकरे गटाचे प्रमुख यांच्या गाडीवर मनसैनिकांकडून शेण फेकण्यात आलय. उद्धव ठाकरेंचा आज ठाण्यामध्ये 'भगवा सप्ताह मेळावा' पार पडणार आहे. त्यापूर्वी मनसैनिकांकडून उद्धव ठाकरेंच्या कारवर हल्ला करण्यात आलाय. काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. त्यानंतर मनसेने आता थेट उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण फेकले आहे. उद्धव ठाकरेंचा ताफा जात असताना मनसैनिकांनी त्यांच्या गाडीवर शेण फेकले आहे. शिवाय, ठाकरेंच्या ताफ्यावर बांगड्या आणि टोमॅटो फेकण्यात आले आहेत.
मनसेच्या वतीने उध्दव ठाकरे यांच्या ताब्यातल्या गाडीवर फुगे मारण्यात आले
उद्धव ठाकरेंचा आज ठाण्यातील रंगतनमध्ये मेळावा पार पडणार आहे. त्यापूर्वी या सभास्थळी मनसैनिक घुसले आहेत. सभास्थळी मनसैनिकांकडून गोंधळ घालण्यात येतोय. पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड सुरु केली आहे. मनसेच्या वतीने उध्दव ठाकरे यांच्या ताब्यातल्या गाडीवर फुगे मारण्यात आले आहेत. ठाण्यातील गडकरी रंगा येथे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली आहे. मनसेच्या वतीने बांगड्या टाकून उद्धव ठाकरे यांच्या निषेध करण्यात येतोय. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या वाहनाखाली टायर जवळ सुपारी ठेवण्यात आलेल्या आहेत.
उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन सुरु
उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल झाल्यानंतर मनसैनिक थेट सभागृहात घुसले आहेत. जवळपास 50 ते 60 मनसैनिक आहेत. सध्याच्या घडीला देखील मनसैनिकांकडून आंदोलन केले जात आहे. उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. काही वेळापूर्वी मुस्लीम समाजानेही मातोश्रीबाहेर आंदोलन सुरु केले होते. त्यावेळी मातोश्रीबाहेर तणाव वाढला होता. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेला आव्हान करणारा अजून पैदा झाला नाही हिंमत असेल तर समोर या. एक माणूस हा दोनदा मतदान करत होता ही सर्व माहिती निवडणूक आयोगाला आम्ही दिली आहे. आम्हाला रस्त्यावरती येऊन लढा करावा लागेल. लोकसभेमध्ये जरी पराभव झाला असला तरी विधानसभेला भगवा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असंही राजन विचारे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंविरोधात मुस्लिम समाज आक्रमक, जोरदार घोषणाबाजी, मातोश्री बाहेर तणाव वाढला