एक्स्प्लोर

शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला

Hemlata Patil : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्याआधी शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

Hemlata Patil : विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या काँग्रेसच्या प्रवक्त्या व माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील (Hemlata Patil) यांनी अखेर बुधवारी शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) प्रवेश केला. त्यांच्यासोबत नाशिकरोडच्या ठाकरे गटाच्या चार टर्म नगरसेविका असलेल्या माजी उपमहापौर, व्यापारी बँकेच्या संचालिका रंजना बोराडे (Ranjana Borade) आणि सिडकोतील दीपक दातीर (Deepak Datir) यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्यामुळे शिंदे गटाने एकाच वेळी काँग्रेस आणि ठाकरे गटाला धक्का दिला आहे. 

नवी दिल्लीत शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. हेमलता पाटील या काँग्रेसमध्ये (Congress) नाराज होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या काँग्रेस सोडतील, अशी चर्चा होती. अखेर बुधवारी त्यांनी शिडे गटात प्रवेश केला. जॉय कांबळे यांनीही दोन महिन्यांपूर्वी काँग्रेसचा हात सोडला होता. त्यामुळे काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत आहे. 

ठाकरे गटाच्या दोन माजी नगरसेवकही शिंदे गटात दाखल

तर उबाठाचे माजी नगरसेवक व युवासेना जिल्हाप्रमुख दीपक दातीर यांच्या प्रवेशाने ठाकरे गटालाही धक्का बसला आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्याला खा. नरेश म्हस्के, विधान परिषद उपसभापती नीलमताई गोहे, मंत्री प्रताप जाधव, माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख  अजय बोरस्ते यांच्यासह कार्यकर्ते व नेतेमंडळी उपस्थित होती. 

शिंदेंची काम करण्याची पद्धत विलासरावांसारखी : हेमलता पाटील 

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हेमलता पाटील म्हणाल्या, एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धत ही माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासारखी आहे. शिंदे यांच्याकडून मी कोणतेही आश्वासन घेतले नाही. काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये आजपर्यंत काम केले आहे. आणि एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धत पाहिल्यानंतर मला विलासराव देशमुख यांची आठवण येते. सतत जो कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध असणारा व्यक्ती आणि मला असे वाटत होते की, त्याच व्यक्तीची आता गरज आहे. आणि त्या व्यक्तीच्या हाताखाली आपण काम केले पाहिजे. त्यामुळे मी शिंदे सेनेत प्रवेश केला असल्याचे त्यांनी म्हटले.

शिंदेंच्या नाशिक दौऱ्याआधीच शिवसेनेत मोठं इनकमिंग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख दीपक दातीर, माजी नगरसेविका रंजना बोराडे या लवकरच नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 14 फेब्रुवारी रोजी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या नाशिक दौऱ्याआधीच शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाला इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांची पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. 

आणखी वाचा 

Maharashtra Cabinet: देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 मोठे निर्णय; एकनाथ शिंदेंचा मार्ग मोकळा, मंत्रालयात नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती; प्रत्यक्षात एका खासदाराशीच झालं बोलणं
उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती; प्रत्यक्षात एका खासदाराशीच झालं बोलणं
EVM मधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताचं भाजपनं मशिन्स जाळल्या, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप
EVM मधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताचं भाजपनं मशिन्स जाळल्या, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप
रोहित पवारांचं आंदोलन मनोज जरांगे स्टाईल अन् नौटंकी; भाजप आमदाराची टीका, अन्नत्याग उपोषणाची उडवली खिल्ली
रोहित पवारांचं आंदोलन मनोज जरांगे स्टाईल अन् नौटंकी; भाजप आमदाराची टीका, अन्नत्याग उपोषणाची उडवली खिल्ली
BJP : सांगली सातारा विधानपरिषदेत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा प्लॅन, सांगली महापालिकेचे नगरसेवक अज्ञातस्थळी, एसी बसमधून सहलीला रवाना
सांगली सातारा विधानपरिषदेत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा प्लॅन, सांगली महापालिकेचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना

व्हिडीओ

Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Malshiras Pickup Accident : माळशिरसमध्ये पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, रस्ता सुरक्षा उपाय योजना नाहीत, बैठका होतात पण कंत्राटदारांवर कारवाई होत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य
माळशिरसमध्ये भीषण अपघात, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, चार चार वर्ष कामं अपूर्ण, पत्रव्यवहार केला तरी दखल घेत नाहीत...
Solapur Accident: दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
Embed widget