Eknath Shinde : आमश्या पाडवी हा आमचाच माणूस, तो आमच्यात होता, जाता जाता त्याला मतदान करून गेलो : एकनाथ शिंदे
Amsha Padvi Joins Shinde Faction : शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी आज शिवसेना शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे.
CM Eknath Shinde : शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का आज मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी (Amsha Padvi) यांनी आज शिवसेना शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. आमश्या पाडवी नंदुरबारमधील काही नगरसेवकांनीही ठाकरे गटाची साथ सोडली आहे.
पक्षप्रवेश झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपले आमदार पाडवी यांचे मी स्वागत करतो. त्यांचा मुलगा, पत्नी आणि पदाधिकारी आले आहेत. शिवसेनेत सामील झाले आहेत. पाडवी हा आमचाच माणूस आहे. आम्ही जाता जाता त्याला मतदान केले होते. आज शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडेच आहे. अनेक जण म्हणतात चुकीचे आहे. पण ज्या पक्षांकडे शिवसैनिक नाहीत ती शिवसेना कशी?खरी शिवसेना आपणच आहोत.
एकच दरवाजा उघडा होता तो म्हणजे युतीचा
नीलम गोऱ्हे यांच्यापासून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्यासोबत आले. त्यामुळे चुकीचा निर्णय 2019 मध्ये कोणी घेतला हे जनतेने दाखवले. पाडवी बरोबर म्हणाले की, ज्यांच्या सोबत लढलो त्याच काँग्रेससोबत आपण कसे काम करायचे. अनेक जण म्हणाले आम्हाला सर्व दरवाजे उघडे आहेत. पण एकच दरवाजा उघडा होता तो म्हणजे युतीचा.
त्यांचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही
राजकारणात विचार, नीतिमत्ता आपल्याला पाळायला लागतात. मग आम्ही ठरवले की, स्वतःसाठी कोणी पक्ष दावणीला बंदी करू शकत नाही. लोकशाहीत पक्ष प्रमुखाने जर चुकीचा निर्णय घेतला तर आपण वेगळा निर्णय घेऊ शकतो. नंदुरबारसारख्या दुर्गम भागात पाडवी चांगले काम करत आहे. आणखी लोक येणार आहेत. कोणी गेला की तो कचरा, कोणी गद्दार म्हणतात. आम्ही हेच म्हणतो जे म्हणाले त्यांचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही, असा टोला एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला लगावला.
निवडणुकीच्या अगोदर महाविकास आघाडीला चपराक
जर आमचा निर्णय योग्य नसता तर पाडवी आले असते का? महायुती सरकारने 45 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांवर खर्च केले. आता नावात आईचे नाव द्यायचे हा आईचा गौरव आहे. मी घरात बसून उंटावरून बसून शेळ्या हाकणारा नाही. निवडणुकीच्या अगोदर महाविकास आघाडीला एक चपराक आपल्या पाडवीने दिली आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
अब की बार 45 पार
आज कुणाच्या पदयात्रा आहेत. कोण पायी चालत आहे. इंडिया आघाडी आले आहेत. डबल इंजिनच्या सरकारमुळे फायदा झाला. काही लोक मर्यादा सोडून बोलत आहेत. त्यांना आज उत्तर देणार नाही. अब की बार 45 पार, असे त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले आमश्या पाडवी?
आमश्या पाडवी म्हणाले की, नंदुरबारचा विचार केला तर अजून तसा विकास झाला नाही. म्हणून आज मी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून माझ्या सहकाऱ्यांसोबत पक्ष प्रवेश करत आहेत. ज्यांनी आपल्याला आमदार केले त्यांची विनंती होती की, नंदुरबारच्या विकासासाठी आपल्याला जायला पाहिजे. आम्ही एवढे दिवस काँग्रेस सोबत होतो. पण आता अनेक जण सोबत घेऊन प्रवेश करत आहे. माझ्या अतिदुर्गम भागात जी परिस्थिती आहे. ती बदलण्यासाठी तिथले कुपोषण आणि इतर विषय सोडवण्यासाठी मी प्रवेश करतोय. मी शिवसेनेत काम करत असताना भुसे मार्गदर्शन करत होते. माझा मुलगा पत्नी आणि आम्ही सर्व आलो आहोत. माझ्या भागातील कुपोषण सोडवावे. बाळासाहेब यांच्या विचारांच्या मागे आलो आहे, असे पाडवी यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा