एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 4PM TOP Headlines 4PM 02 January 2025
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 4PM TOP Headlines 4PM 02 January 2025
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला घेण्याकरीता उज्ज्वल निकमांना विनंती करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती...कल्याणप्रमाणे बीडचा खटलाही निकम लढणार का, याकडे लक्ष
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार...महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती..शासन निर्णयात बदल होणार नाही मात्र निकषांच्या बाहेरचे अर्ज बाद होणार..
वाल्मिक कराडने सरेंडर करण्यासाठी वापरलेली कार अजित पवारांच्या ताफ्यातली, भाजप आमदार सुरेश धस यांचा मोठा दावा.
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही, खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपींच्या फाशीसाठी प्रयत्न करण्याचंही आश्वासन
बीड पोलिसांकडून मुख्य आरोपी 'वॉन्टेड' म्हणून घोषित.. आरोपींची माहिती देणाऱ्याला योग्य बक्षीस देणार.. प्रसिद्धीपत्रकातून घोषणा..
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी पहिल्यांदा आपणच केली, धनंजय मुंडेंचा दावा, दोषींना फाशीच व्हावी, मुंडेंची मागणी